शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

राहुल गांधींचे मुद्दे जिव्हारी लागल्यानेच खासदारकी रद्द - पृथ्वीराज साठे 

By दीपक देशमुख | Updated: March 31, 2023 17:03 IST

'परदेशात देशहितासाठी जातात की अदानी कंपनीच्या मार्केटिंगसाठी'

सातारा : अदानींच्या विदेशातील कंपनीत २० हजार कोटींची गुंतवणूक झालेला पैसा कुणाचा, हा राहुल गांधींनी संसदेत केलेला प्रश्न जिव्हारी लागल्यामुळेच स्थगिती लागलेले प्रकरण पुन्हा बोर्डावर आणून गांधी यांना दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व आसामचे सहप्रभारी पृथ्वीराज साठे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पंतप्रधान परदेशात देशहितासाठी जातात की अदानी कंपनीचे मार्केटिंग करायला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.सातारा येथे ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रणजितसिंह देशमुख, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, रजनी पवार, अजित पाटील-चिखलीकर, धनश्री महाडिक, मालन परळकर, अरबाज शेख-मोकाशी आदी उपस्थित होते.काँग्रेसच्या वतीने मोदी आणि अदानी यांच्या भागीदारीबाबत वास्तव जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने देशभरात पत्रकार परिषदा आयोजित केल्याचे सांगून साठे म्हणाले, देशाच्या संरक्षण क्षेत्रातील ठेका अदानी यांच्या माेठ्या भावाच्या कंपनीकडे आहे. याच कंपनीत एका चँग चूंग लिंग या चिनी उद्योजकाचीही मोठी गुंतवणूक आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ही गंभीर बाब आहे. पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेचे, ऑस्ट्रेलियाचे दौरे केले. त्यामुळे अदानीला ठेके मिळाल्याचा आरोप साठे यांनी केला.राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटक निवडणुकीत सुशील मोदी व नीरव मोदींचे नाव घेऊन जे वक्तव्य केले, त्याप्रकरणी सुरत उच्च न्यायालयात खटला दाखल केला; पण फिर्यादीने यावर स्थगिती आणली होती. यानंतर राहुल गांधी यांनी २०२३ मध्ये संसदेत उपस्थित केलेले प्रश्न जिव्हारी लागले. यामुळेच २०१९ चे प्रकरण पुन्हा बोर्डावर आणले. अदानीला मोदी एवढे का पाठीशी घालत आहेत. अदानी म्हणजे देश आहे काय? सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली असून, २०२४ ची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असण्याची शक्यता आता अनेक राजकीय नेत्यांना वाटू लागली असल्याचेही साठे यावेळी म्हणाले.

अदानीच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी दबावअदानीच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एसबीआय कंपनीवर दबाव आणला. देशातील सर्वसामान्यांचा पैसा एलआयसीमध्ये गुंतला आहे. या कंपनीला अडचणीत आणण्याचे काम अदानी समूहात गुंतवायला भाग पाडले. यामुळे एलआयसी अडचणीत आली आहे. हिंडेनबर्गच्या पहिल्या अहवालाने इतकी दाणादाण उडाली. आता दुसरा अहवाल आल्यानंतर काय हाेईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGautam Adaniगौतम अदानी