शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

'कुठली ईडी, लाव काडी' म्हणत कराडमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या अटकेचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:39 IST

कराडमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या अटकेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला

Rahul Gandhi Arrested (कराड) - प्रमोद सुकरे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ येथे युवक काँग्रेसने केंद्र सरकारचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कराड काँग्रेसच्या वतीने आज सोनिया गांधी यांची ईडी चौकशी सुरू केल्याबद्दलही निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा संपत असतानाच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांना अटक केल्याची माहिती मिळाली. सोनिया यांच्या चौकशीच्या निषेधार्थ धरणे आंदोलनात राहुल गांधी सहभागी होते. त्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा जाळत या घटनेचा निषेध केला.

कराडच्या शाहू चौकात युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने पुतळा जाळून निषेध आंदोलन केले. 'काँग्रेसचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केल्यास देश पेटून उठेल व हे कदापि सहन केले जाणार नाही', असा इशारा प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज  मोरे यांनी यावेळी बोलताना दिला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKaradकराडcongressकाँग्रेस