लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : युवा ग्रामविकास सामाजिक सेवा संस्था सातारा यांच्यावतीने आकाशवाणी झोपडपट्टी येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत क्रांतिज्योती अभ्यासिका व बाल वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी युवा ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष गणेश वाघमारे, लाल बहाद्दूरशास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, आकाशवाणी केंद्रचे प्रसारण अधिकारी सचिन प्रभुणे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अमित माने, निवृत्त प्राध्यापक डी. एस. कुलकर्णी, चित्रकार सागर गायकवाड, अशोक भोसले या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वल करून या क्रांतिज्योती अभ्यासिका व बाल वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
सातारा आकाशवाणी झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थांना शिक्षण घेताना अडचणी येऊ नयेत, तसेच त्यांना याच परिसरात शैक्षणिक वातावरण निर्माण करून देता यावे. विद्यार्थी व नागरिक यांच्यामध्ये शिक्षणाची जागृती निर्माण करून परिसरातील जास्तीत जास्त मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व त्यांच्या उच्च शिक्षण पूर्ण होईपर्यंत या विद्यार्थांना मार्गदर्शन करण्याचे काम यापुढे युवा ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनासाठी शैक्षणिक व अवांतर वाचनासाठी जवळपास १००० पुस्तके व दोन संगणक असे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. राजेद्र शेजवळ यांनी उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुस्तक मस्तक घडवितात म्हणून या परिसरातील विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचावीत. विद्यार्थ्यांना योग्य वयात नेमके विचार व मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. या अभ्यासिकेच्या निमित्ताने ही सुरुवात येथे होत आहे, याचे विशेष कौतुक आहे. युवा ग्राम विकास सामाजिक सेवा संस्थेने आम्हाला विद्यार्थ्यांचे शिफारस पत्र दिले तर या विद्यार्थांचे शिक्षणासाठी आम्ही दत्तक घेऊ, असा विश्वास सर्वांना दिला.
या उपक्रमासाठी अनेक संस्थांनी मदत केली. कार्यक्रमासाठी युवा ग्रामविकास संस्थेचे उपाध्यक्ष सुशांत भोसले, सचिव राहुल शिरकांडे, डॉ. सतीश खंदारे, साबाळू खुडे, शुभम दाखले, रवी कांबळे, कैलास माने, अमित काळे, अंजना खुडे, अक्का कांबळे, अमरनडे, विवेक मनुकर, प्रतीक धुळेकर, प्रीतम रनबागले, प्रशांत आयसर, ओमकार कुचेकर, आदी उपस्थित होते.
फोटो आहे...
28आकाशवाणी
सातारा आकाशवाणी झोपडपट्टी येथे क्रांतिज्योती अभ्यासिका व बाल वाचनालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.