नवनाथ जगदाळेदहिवडी : जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडीच्या ‘राधा’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या ‘राधा’ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, प्रत्येक प्रदर्शनात ती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.मलवडीतील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी ‘राधा’चा जन्म झाला. ती दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीतील बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने राधाला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला.मात्र, सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. २१ डिसेंबर २०२४ सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात राधाने सहभाग घेतला अन् तिथूनच तिचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगाव, कर्नाटकातील निपाणी यांसह १३ कृषी प्रदर्शनात खास आकर्षण म्हणून ‘राधा’ला निमंत्रित करण्यात आले.२४ जानेवारी २०२५ रोजी राधाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने राधाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. यात पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी १२ सप्टेंबर २०२५ला राधाची पाहणी करून अहवाल पाठवला. २० सप्टेंबरला कागदपत्रे सादर केली व शेवटी २८ ऑक्टोबर रोजी राधाची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली.उंची : २ फूट ८ इंचवजन : २८५ किलो
आमची राधा प्रत्येक कृषी प्रदर्शनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, सामान्य शेतकऱ्यांसह अनेक मान्यवर व तज्ज्ञांच्या आकर्षणाची ती केंद्रबिंदू ठरत आहे. राधाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात राधाला सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - अनिकेत बोराटे, म्हशीचे मालक
Web Summary : Malwadi's 'Radha,' a dwarf buffalo, entered the Guinness World Records. Owned by Trimbak Borate, Radha's unique height of 2 feet 8 inches made her famous after Aniket Borate showcased her at agricultural exhibitions. Her recognition brings pride to her owners.
Web Summary : मालवाड़ी की 'राधा', एक बौनी भैंस, गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स में शामिल हुई। त्रिंबक बोराटे के स्वामित्व वाली, राधा की 2 फीट 8 इंच की अनूठी ऊंचाई ने उसे कृषि प्रदर्शनियों में अनिकेत बोराटे द्वारा प्रदर्शित किए जाने के बाद प्रसिद्ध कर दिया। उसकी पहचान उसके मालिकों के लिए गर्व लेकर आती है।