शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

फायनान्स कार्यालयात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : येथील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय गुरुवारी सकाळी रणरागिणींनी फोडले. ‘मनसे’च्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाची तोडफोड करीत अधिकाºयांच्या तोंडाला काळे फासले. तसेच संबंधित अधिकाºयाला गाढवावर बसविण्यात आले.ग्रामीण भागातील गरजू, गरीब महिलांना मायक्रो फायनान्सच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : येथील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय गुरुवारी सकाळी रणरागिणींनी फोडले. ‘मनसे’च्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाची तोडफोड करीत अधिकाºयांच्या तोंडाला काळे फासले. तसेच संबंधित अधिकाºयाला गाढवावर बसविण्यात आले.ग्रामीण भागातील गरजू, गरीब महिलांना मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून अनेक कंपन्या अर्थपुरवठा करीत आहेत. मात्र, त्यांच्या वसुलीची पद्धत महिलांना जेरीस आणणारी आहे. कर्ज घेतलेल्या अनेक महिला हप्ते भरून कंटाळल्या तरी कर्ज फिटत नाही. या परिस्थितीने महिला बेजार झाल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपनीच्या नावाखाली सुरू असणाºया या सावकारीला चाप लावण्यासाठी मनसेचे संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात व्यापक आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांना वसुलीबाबत काही सूचना केल्या आहेत.‘मनसे’च्या आठ पदाधिकाºयांना अटकदिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे ट्रान्जक्शन आॅफिसर वैभव काशीनाथ कांबळे(रा. शिरवडे, ता. कºहाड) यांनी याबाबतची फिर्याद कºहाड शहर पोलिसांत दिली आहे. त्यानुसार मनसेचे जिल्हा संघटक मनोज माळी (रा. करवडी), जिल्हा सचिव सागर पवार (रा. पिंपरी, ता. कोरेगाव), मनोज सदाशिव माळी (रा. मसूर), स्वराज्य प्रतिष्ठानचे मधुकर जाधव (रा. दिवशी बुद्रुक, ता. पाटण), भानुदास डार्इंगडे (रा. कापिल), स्वाती धनंजय माने (रा. नांदलापूर), मनीषा युवराज चव्हाण (रा. निसरे, ता. पाटण) व भारती भगवान गावडे (रा. वाठार) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या आठजणांना अटक केली आहे. संशयितांनी कार्यालयात तोडफोड करून १ लाख २५ हजारांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिकाºयाला बसविले गाढवावरकºहाड येथे दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे एक कार्यालय आहे. या ठिकाणी असलेल्या कार्यालयातून शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजू महिला तसेच बचतगटांना अर्थसाहाय्य केले जाते. येथील कार्यालयातील अधिकाºयांनीही तालुक्यातील महिलांना अर्थसाहाय्य केले होते. देण्यात आलेल्या पैशांचे हप्ते जेव्हा वसूल करण्याची वेळ आली तेव्हा कंपनीच्या प्रतिनिधींनी महिलांना नाहक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अखेर मनसेचे जिल्हा संघटक मनोज माळी यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी कंपनीच्या अधिकाºयांना कार्यालयातून खुर्चीवरून थेट गाढवावर बसविले.