शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

राष्ट्रवादीला जनता माफ करणार नाही

By admin | Updated: April 17, 2017 13:12 IST

मेघा कुलकणीर् : वाईत भाजप कार्यकर्ता मेळावा

आॅनलाईन लोकमतवाई (जि. सातारा), दि. १७ : प्रत्येक निवडणुकीत हजारो कोटींची कामे केली, असा डांगोरा पिटून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा राष्ट्रवादीचा धंदाच आहे. विकासाचा बागुलबुवा करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना वाई तालुक्यातील जनता कदापि माफ करणार नाही,असा आरोप आवाहन कोथरुडच्या आमदार मेघा कुलकर्णी यांनी केला. वाई येथील आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे अनावरण नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या दालनात करण्यात आले. दशलक्ष भीम या मोबाईलवरील अ‍ॅपचा प्रारंभ करण्यात आला. उज्ज्वला योजनेतील लाभधारकांना गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या समाजोपयोगी विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी माजी खासदार व किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश फरांदे, जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, विजाया भोसले, नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, बापूसाहेब शिंदे, युवा तालुकाध्यक्ष विक्रम वाघ, तालुका सरचिटणीस अशोक वाडकर, शहराध्यक्ष अजित वनारसे, महिला आघाडी शहराध्यक्षा सायली गोरे, राकेश फुले, नगरसेविका रुपाली वनारसे, वासंती ढेकाणे, प्रवीण बाबर, प्रशांत जगताप, प्रदीप क्षीरसागर, दिलीप वाडकर, डॉ, अशोक वाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. माजी खासदार गजानन बाबर म्हणाले, ह्यवाई तालुक्यात राष्ट्रवादी म्हणजे नावाप्रमाणेच वाद निर्माण करून गावागावात भांडणे लावण्याचेच काम केले आहे. गावांचा विकास करण्याऐवजी गावाचे सामाजिक स्वास्थ धोक्यात आणले आहे. यांचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. वाई तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणार आहे. कार्यक्रमाचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे यांनी प्रास्ताविक केले. अशोक वाडकर यांनी सूत्रसंचालन केले व अजित वनारसे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास वाई तालुक्यातील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)