शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा  जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर मिळणार मानसिक आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 14:08 IST

सातारा : कोरोना विषाणुमुळे सर्व समाज धास्तावलेला आहे. अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. आता ...

ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : समुपदेशनाची सुविधा; अनेक संस्थांचा सहभाग

सातारा : कोरोना विषाणुमुळे सर्व समाज धास्तावलेला आहे. अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. आता लोकांना मानसिक आधार आणि समुपदेशन देण्याची यंत्रणाही जिल्हा प्रशासनाने चालू केली आहे. यामध्ये अनेक संस्थांचा आणि मान्यवरांचा सहभाग राहिलाय.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे समाजातील अनेक लोक मानसिक तणावातून जात आहेत. त्यातच काहीजण कुटुंबापासूनही लांब आहेत. कोणाशी प्रत्यक्ष भेटता न येणं हे सुद्धा एक ताणाचे कारण असू शकते. त्यामुळे आपल्याला नेमका कशाने संसर्ग होऊ शकतो आणि काय केल्याने त्यापासून सुरक्षित राहू असे विचारही त्रास देवू शकतो. अशा परिस्थितीत भावनिक अस्वस्थता वाटत असलेल्या लोकांना भावनिक प्रथमोपचार मिळावे यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने चालणाऱ्या टोल फ्री हेल्प लाईनवर मानसिक आधार आणि समुपदेशनाची देखील सुविधा आता उपलब्ध आहे. उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाचे अधिकारी, परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंनिस आणि काही समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून मनोबल हेल्प लाईनच्या वीसपेक्षा अधिक तज्ज्ञ समुपदेशक आणि प्रशिक्षित मानस मित्र आणि मैत्रिणींच्या माध्यमातून ही सुविधा चालवली जाणार आहे.

मनोविकार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर, समुपदेशक रुपाली भोसले, योगिनी मगर आणि राणी बाबर समन्वयाचे काम पाहणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे ज्यांना अस्वस्थता, भीती, निराशा, वाटत असेल अशा लोकांना समजून भावनिक आधार आणि समुपदेशन मनोबल हेल्पलाईनच्या माध्यमातून दिले जाणार आहे.माहिती गोपनीय राहणार...मराठी आणि हिंदी भाषेतून ही सेवा पुरवली जाईल. केवळ एक फोन करून ही सुविधा मिळू शकते. ही सेवा मोफत असून यासाठी कोणतेही शुल्क नाही. तसेच माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. स्थलांतरित कामगार आणि हातवार पोट असलेल्या लोकांना अडचणी सोडवण्याचा आणि त्यांना आधार देण्याचे काम देखील यामार्फत केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdocterडॉक्टर