शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी जमीन अधिग्रहित करून पाटण तालुक्यातील सात गावांचे पुनर्वसन : मुख्यमंत्री शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 19:08 IST

या गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार

मुंबई/सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सात गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले. या गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार असून त्यांच्यासाठी खासगी जमीन अधिग्रहीत करुन ५५० घरे बांधण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.मंत्रालयात मुख्यमंत्री समिती कक्षात पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. बैठकीला आमदार शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला, साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाडे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या आंबेघर खालचे, अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुबळी, शिदुकवाडी, जितकरवाडी (निती) या ७ गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने खासगी जमीन खरेदीकरिता तातडीने कार्यवाही करण्यात यावी. या गावामध्ये ५५० घरे नव्याने उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी. जेणेकरून या गावांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व समन्वयन यंत्रणांनी गतीने काम करावे.

पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आग्रही : जिल्हाधिकारी जयवंशीपाटण तालुक्यासह इतर भागातील पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. जिल्ह्यातील धरणांमुळे काही गावांचे पुनर्वसन झालेले आहे. पण, त्यांना जमिनी मिळालेल्या नाहीत किंवा अर्धवट स्थितीत पुनर्वसनाचा प्रश्न राहिलेला आहे. असे सर्व प्रश्न सोडविण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. आपणही आता अशा गावांचे प्रस्ताव देत असून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.राखीव आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जमीन हस्तांतराचे आदेशपश्चिम महाराष्ट्रात वारंवार येणाऱ्या आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी नजीकच्या ठिकाणी राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्रस्तावित राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी ३९ हेक्टर जमीनीची मागणी पोलीस महासंचालकांनी महसूल विभागाकडे केली आहे. त्यानुसार ही जागा पोलीस अधिक्षक सातारा यांच्याकडे वर्ग करण्याबाबत महसूल विभागाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदे