शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत निवडणुकीच्या कामात  अन् जनता कोमात! दाखल्यांसाठी हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:11 IST

सातारा : जिल्ह्यातील अधिकाºयांना निवडणुकीचे अतिरिक्त काम लागले आहे. सर्वच प्रांताधिकाºयांकडे विधानसभानिहाय सहायक निवडणूक अधिकाºयांचा कार्यभार देण्यात आला आहे. ...

ठळक मुद्दे ४५ दिवसांपर्यंत कामचलाऊपणा

सातारा : जिल्ह्यातील अधिकाºयांना निवडणुकीचे अतिरिक्त काम लागले आहे. सर्वच प्रांताधिकाºयांकडे विधानसभानिहाय सहायक निवडणूक अधिकाºयांचा कार्यभार देण्यात आला आहे. या कामातून त्यांना विविध दाखल्यांवर सह्या करायला वेळच मिळत नाही, अशी परिस्थिती असल्याने गरजवंत लोक तणावात आले आहेत. 

प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच त्यांच्या हाताखाली काम करणारी सगळीच मंडळी सध्या निवडणूक कामाशिवाय काही बोलायलाच तयार नाहीत. सातारा प्रांत कार्यालयात तर दिवसातून अनेकदा अधिकाºयांच्या मीटिंग होत असतात. अधिकारी त्यांच्या खुर्चीत आढळत नाहीत, सर्व अधिकारी मीटिंगमध्ये असल्याचे कर्मचाºयांना विचारले असता उत्तर मिळते. लोकांना उत्पन्न, डोमासाईल, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांसाठी प्रांताधिकारी व तहसील कार्यालयात जावे लागते. काहींना वेळ महत्त्वाची असते. तेवढ्या वेळात दाखले मिळाले नाहीत तर अडचणी निर्माण होतात. नोकरी, शिक्षणाचा हातातोंडाशी आलेला घासही पोटात जाऊ शकत नाही. 

प्रत्येक तहसील, प्रांत कार्यालयाच्या बाहेर सेतू कार्यालये आहेत. या सेतूमधून तयार झालेले दाखले अधिकाºयांच्या सहीसाठी नेले जातात; परंतु अधिकाºयांच्या इतर कामांच्या व्यस्ततेमुळे या दाखल्यांवर सह्या होत नसल्याने लोकांना हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय उरत नाही. प्रवास खर्च करून आलेल्या लोकांना विना अन्नपाण्याचे घराकडे माघारी परतावे लागत आहे. 

प्रांताधिकारी व सेतू यांच्यामध्ये जो दुवा असतो, तो कारकूनच सातारा प्रांत कार्यालयात नाही. त्यामुळे शिपाई दर्जा कर्मचारीच सगळी धावाधाव करताना दिसतो. या परिस्थितीत गरजू लोकांचे हाल होताना पाहायला मिळतात. मुदत वाढल्याने अधिकारी सुस्ततहसीलदारांकडून उत्पन्न व इतर प्रमाणपत्रे मिळण्याचा कालावधी पूर्वी ५ दिवस होता, तोच आता १५ दिवसांचा करण्यात आला आहे. तर जात, नॉन क्रिमिलियर हे दाखले मिळण्याचा कालावधी १५ दिवसांचा होता, तोच आता ४५ दिवसांचा करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारीही गहू तेव्हा पोळ्या म्हणत शेवटच्या दिवशीच सह्यांचा सोपस्कार करत असल्याच्याही तक्रारी आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार