शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात भाजप विरोधात निषेधासन आंदोलन, फडणवीस सरकार हे फसवणीस सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 14:59 IST

केंद्र सरकारसह राज्य शासनाने गेल्या चार वर्षात जनतेची केवळ फसवणूक केलेली आहेत. तसेच जाहिरातबाजी करून सर्वसामान्यांना लुटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार हे फसवणीस सरकार आहे, अशी टीका करीत कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर बुधवारी भाजप विरोधात जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी निषेधासन आंदोलन केले.

ठळक मुद्देकऱ्हाडात भाजप विरोधात निषेधासन आंदोलनफडणवीस सरकार हे फसवणीस सरकारयुवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची टीका

कऱ्हाड : केंद्र सरकारसह राज्य शासनाने गेल्या चार वर्षात जनतेची केवळ फसवणूक केलेली आहेत. तसेच जाहिरातबाजी करून सर्वसामान्यांना लुटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार हे फसवणीस सरकार आहे, अशी टीका करीत कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर बुधवारी भाजप विरोधात जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेधासन आंदोलन केले.येथील कोल्हापूर नाक्यावर बुधवारी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दुपारी अकरा वाजल्यापासून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव गणेश जगताप, जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष अमित जाधव, दक्षिण उपाध्यक्ष समीर पटवेकर, पाटण तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, दादासाहेब काळे, अजित भोसले, जितेंद्र यादव आदींसह जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य शासनाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर निषेधासन आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर