शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीज, वाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:16 IST

सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.

ठळक मुद्देपावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीजवाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक, धान्य अन् जीवनावश्यक वस्तूंचा साठा

लक्ष्मण गोरे बामणोली : सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून ते सप्टेंबर ही चार महिने अति पावसाचे असतात. मान्सून सुरू झाला की दळणवळण व संपर्काची यंत्रणा ठप्प होतात. जावळी तालुक्यातील देऊर, वेळे, तळदेव मायणी, कारगाव तसेच नदीपलीकडील आडोशी, कुसापूर शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील पर्वत, चकदेव, कांदाट अशी गावे अतिदुर्गम आहेत.

या गावांसह डोंगरावर राहणाऱ्या अनेक गावातील लोकांना वाहतुकीसाठी असणारा कच्चा रस्ता पावसात बंद असतो. अशा ठिकाणचे ग्रामस्थ साखर, मीठ, कांदे, बटाटे, खते भिजून खराब होणाऱ्या वस्तूंसह धान्य, डाळी, कपडे याखेरीज पुरेशा रोख रक्कमेचीही तजवीज पावसाळ्यापूर्वीच करून ठेवतात. पावसाळ्यात चार महिने संततधार पाऊस कोसळत असतो.

पावसाळ्यात घरांना गळती लागू नये म्हणून येथील कौलारू तसेच मातीची असणारी घरे प्लास्टिक कागद तसेच कोळंबाने शेकारतात. या गवतामुळे घरात पावसाचे पाणीही येत नाही. शिवाय ऊबदारपणा टिकून राहण्यास मदत होते. घरांची डागडुजी उन्हाळ्यातच सुरू असते.जनावरांची वैरण अन् सरपण पोटमाळ्यावरतापोळा, बामणोली विभागातील अनेक गावे उंच, दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेली आहेत. या ठिकाणी दाट धुके व संततधार पाऊस असतो. अशा वेळी पाळीव जनावरांसाठीचा कोरडा चारा घरातील पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला असतो. तसेच स्वयंपासाठीची जळावू लाकडेही घरातील पोटमाळ्यावर किंवा एका स्वतंत्र खोलीत साठा करून ठेवली जातात.

लॉकडाऊनमुळे यंदा चाकरमानी गावालाच आहेत. नदीपलीकडील गावांना लाँच बंद तसेच लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने अनेक ग्रामस्थांना पावसाळ्यातील अन्नधान्यसाठा करता आला नाही.- शिवराम चव्हाण,लामज, ता. महाबळेश्वर

पावसाळ्याचा धान्यसाठा तळदेव ग्रामस्थांनी सातारा येथे खरेदी करून ठोसेघर पठारापर्यंत वाहतूक करून तेथून डोंगरातून दीड तास डोक्यावरून घरापर्यंत नेला आहे. दरवर्षी कसरत करावी लागते.- पांडुरंग पवार, तळदेव, मायणी, ता. जावळी.

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर