शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील मत्स्यबीज निर्मिती घटली : मागणी असूनही बीज मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:39 IST

सागर गुजर । सातारा : जिल्ह्याच्या मत्स्य बीजनिर्मितीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. वर्षाकाठी सरासरी ८० लाख मत्स्य बीजनिर्मिती ...

ठळक मुद्देधोम धरण बीजनिर्मिती केंद्रातून पाण्याची गळती‘लोकमत’ने याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एक वेगळीच माहिती समोर आली.

सागर गुजर ।सातारा : जिल्ह्याच्या मत्स्य बीजनिर्मितीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. वर्षाकाठी सरासरी ८० लाख मत्स्य बीजनिर्मिती करणाऱ्या धोम येथील प्रकल्पातून चालू वर्षी अवघी ७ ते ८ लाख बीजनिर्मिती झाली आहे. या व्यवसायाकडे वळू इच्छिणाºया तरुणांची यामुळे निराशा झाली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार बाळासाहेब पाटील यांनी मत्स्य बीज उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा मांडला होता. तसेच या विभागात काम करणारा एक अधिकारी स्वत: केज चालवत असल्याने निर्माण केलेले बीज त्यांच्या केजसाठीच वापरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या आरोपानंतर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते.

‘लोकमत’ने याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एक वेगळीच माहिती समोर आली. मत्स्य विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘धोम धरणालगत ५ एकरामध्ये मत्स्यबीज निर्मितीचा फार्म आहे. हा फार्म शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत चालविला जातो. येथे मत्स्यबीज निर्मिती करून ते संपूर्ण जिल्ह्यात पुरविले जाते. यंदा पाण्याअभावी बीजनिर्मिती घटली. धोम इरिगेशनकडूनही पाणी उपलब्ध झाले नसल्याने पाण्याअभावी बीजनिर्मिती कमी झाली आहे.मंजूर निधीची प्रतीक्षाराष्ट्रीय कृषी विकास योजनेतून धोम येथील मत्स्य बीजनिर्मिती केंद्राच्या नूतनीकरणासाठी सव्वातीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा निधी अद्याप मिळालेला नाही. तो मिळाल्यास या केंद्रातून पुन्हा मोठ्या संख्येने बीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे.

 

जिल्ह्यातील मत्स्य बीजनिर्मितीमध्ये घट झाली असल्याने मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या विभागातील अधिकाºयांनी कुठेही केज स्वत: चालवायला घेतलेले नाही. संबंधित अधिकाºयांवर गैरसमजातून आरोप झाले आहेत. धोमच्या फार्मची डागडुजी झाल्यास मोठ्या संख्येने बीजनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.- श्रीकांत वारुंजीकर, प्रभारी सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय

टॅग्स :fishermanमच्छीमारDamधरण