शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एआयबीई परीक्षेत प्रियंका संकपाळ-जाधव देशात प्रथम, फिंगरप्रिंट विभागातील अत्यंत कठीण परीक्षा

By दीपक शिंदे | Updated: September 23, 2022 12:17 IST

तब्बल २० वर्षांनंतर त्यांनी फिंगरप्रिंट विभागाची मानाची समजली जाणारी सर अजीज-उल-हक ट्रॉफी महाराष्ट्राला मिळवून दिली. या परीक्षेत देशातील विविध राज्यातील एकूण ७६ फिंगरप्रिंटचे अधिकारी उपस्थित होते.

सातारा : अखिल भारतीय बोर्ड विशेषज्ञ परीक्षेमध्ये महाराष्ट्र अंगुली मुद्रा केंद्र विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रियंका संकपाळ-जाधव यांनी सुयश मिळवत देशात पहिला येण्याचा मान मिळवला. दिल्ली येथील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत त्यांनी २५० पैकी २२४ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवत, साताऱ्याच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला आहे.केंद्रीय परीक्षेत संकपाळ-जाधव या बहुमान मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.तब्बल २० वर्षांनंतर त्यांनी फिंगरप्रिंट विभागाची मानाची समजली जाणारी सर अजीज-उल-हक ट्रॉफी महाराष्ट्राला मिळवून दिली. या परीक्षेत देशातील विविध राज्यातील एकूण ७६ फिंगरप्रिंटचे अधिकारी उपस्थित होते. ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक व मुलाखत स्वरूपात घेण्यात आली होती. विशेष म्हणजे फिंगरप्रिंट विभागातील अत्यंत कठीण परीक्षेत त्यांनी हे यश मिळवले आहे.प्रियंका संकपाळ-जाधव या सध्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सीआयडी पुणे येथे कार्यरत आहेत.  सातारा तालुक्यातील अतिदुर्गम अशा धावली गावच्या त्या रहिवासी आहेत. यावेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) पंकज देशमुख, अंगुली मुद्रा केंद्र पोलीस अधीक्षक श्रीरंग टेकवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिदास कसार आदी उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस