शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी प्रवासी बस उलटली; रत्नागिरीतील दोघी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:06 IST

नागठाणे : भरधाव खासगी प्रवासी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील ...

ठळक मुद्देखासगी प्रवासी बस उलटलीरत्नागिरीतील दोघी जखमी

नागठाणे : भरधाव खासगी प्रवासी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील दोघी जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास सातारा तालुक्यातील माजगाव फाट्याजवळ झाला. शारदा शांताराम कुंभार (वय ६९) आणि संपदा दीपक कुंभार (१९) असे जखमींची नावे आहेत.याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास कऱ्हाडकडून साताऱ्याकडे खासगी प्रवासी गाडी (एमएच ०८ ई ९४१२) घेऊन चालक सुमित संजय जाधव (रा. उद्दमनगर, रत्नागिरी) हे निघाले होते. त्यांची गाडी मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास माजगाव हद्दीत आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे दुभाजकावर आदळून उलटी झाली. गाडीमधील महिला आणि मुलीस गंभीर दुखापत झाली.अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे हवालदार मनोहर सुर्वे, राजू शिखरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नागठाणे येथे पाठवून दिले. रस्त्यावरच गाडी पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. याबाबतची सहदेव रामचंद्र पावसकर (रा. गावखडी, कुंभारवाडी) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली. हवालदार मनोहर सुर्वे तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर