शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाई- पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात खाजगी बस पेटली; सुदैवाने जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 19:52 IST

दुपारी तीनची घटना

वाई :- पसरणी घाटात नागेवाडी फाट्याजवळ दुपारी तीनच्या सुमारास एका खाजगी बसने पेट घेतला, या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जाळून खाक झाली, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पसरणी घाटात वाहतूक मोठ्या प्रमाणात होती.

माणगांव (गोरेगांव) येथील खाजगी कंपनी मधील कर्मचाऱ्यांची सहल सपकाळ ट्रॅव्हल्सच्या बस ( एम एच -०६ एस ९३५४) ने पंढरपूरला गेली होती, तेथून रविवारी सकाळी मांढरदेव मार्गे महाबळेश्वरला निघाले असता, दुपारी तीनच्या सुमारास पसरणी घाटात बस आली त्यावेळी शेजारून जाणाऱ्या वाहन चालकाने बसमधून धूर येत असल्याचे चालकास सांगून सतर्क केले. चालक रवींद्र कोळसकर वय ४७ वर्षे रा.माणगांव यांनी प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील सर्व प्रवाशी खाली उतरविले, त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.

या बसमध्ये लहान मुलांसह ३९ प्रवाशी होते, या घटनेची माहिती मिळताच वाई व पांचगणी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी दाखल झाले, त्यांनी घटनेची गांभीर्य ओळखून वाई-पाचगणी अग्निशमन बंबाला पाचारण केले, वाई पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्याचे प्रयन्त केला परंतु संपूर्ण बस जाळून खाक झाली, दरम्यान या घटनेमुळे वाई पाचगणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती, बस विझविल्या नंतर पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर