शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

पृथ्वीराजांच्या टापूत मोदी-सोनिया!

By admin | Updated: October 5, 2014 23:08 IST

रणभूमी दणाणणार : कऱ्हाडला भाजप, काँग्रेसच्या सभेसाठी हालचाली

कऱ्हाड : महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी असोत अथवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे़ कऱ्हाडच्या आखाड्यात आजपर्यंत अनेकांच्या जाहीर सभा झाल्या़ या सभांमधून काहीजणांनी मतदारांची मने जिंकली तर काहींनी विरोधकांवर आरोपांच्या तोफा डागल्या़ आता याच मैदानावर ‘मोदी लाट’ आणि त्यापाठोपाठ ‘सोनियाचे दिन’ येऊ पाहतायत! येत्या आठवड्यात नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधींच्या सभा येथे होणार आहेत. या सभांसाठी हालचालीही झाल्या आहेत. एवढच नव्हे तर या सभांसाठी प्रशासनही कामाला लागल्याचे सांगितले जात आहे़ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ ‘हॉट’ बनलाय़ पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले आणि विलासराव पाटील-उंडाळकर या तिरंगी लढतीची अवघ्या राज्याला उत्सुकता आहे़ पृथ्वीराज चव्हाणांना घेरण्यासाठी स्वकीयांबरोबर सर्वच विरोधी पक्षांनी ताकद लावली असून त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी हालचाली सुरू आहेत़ मोदींची सभा गृहित धरून काँग्रेसनेही पक्षाध्यक्षा सोनिया गांधींच्या सभेचे नियोजन चालविले आहे़ पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिणेतून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय पटलावर कऱ्हाडचे महत्त्व खूप वाढले आहे़; पण त्याचबरोबर काँग्रेसचेच विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी बंड केल्याने तर डॉ़ अतुल भोसलेंनी हातात ‘कमळ’ घेतल्याने ही लढत लक्षवेधी मानली जातेय़ शिवसेनेनेही दक्षिणच्या रणांगणात चुरस वाढविण्याचा प्रयत्न केलाय़ पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: प्रचारात आघाडी घेतली आहे़ संपर्क दौऱ्यावर त्यांनी भर दिलाय़ सभाही घेत आहेत़ पतंगराव कदम, सतेज पाटीलही बाबांसाठी जिवाचे रान करतायत़ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे विनोद तावडे, ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या तोफा गेल्या आठवडाभरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात धडाडल्या आहेत़ सोमवारी, दि़ ६ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कऱ्हाडच्या गडावर पोहोचत आहेत़ हे कमी म्हणून की काय, कऱ्हाडात डॉ़ अतुल भोसलेंच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींच्या सभेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत़ गुरूवारी, दि़ ९ मोदींची सभा कऱ्हाडात होऊ शकते़ अवघ्या महाराष्ट्राचे तसेच नेत्यांचेही लक्ष कऱ्हाडकडे असले तरी चव्हाणांचे लक्ष प्रचाराच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रावर असल्याचे दिसत आहे़ राज्यभर माजी मुख्यमंत्र्यांच्या विमानाची घरघर सुरू आहे; पण हे करीत असतानाच वेळ मिळेल तेव्हा त्यांचे विमान कऱ्हाडच्या विमानतळावरही ‘लॅन्ड’ होतेय़ अशातच काँग्रेस पक्षाकडून शनिवार, दि़ ११ किंवा रविवार, दि़ १२ रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेच्या हालचाली सुरू आहेत़ त्यामुळे सध्या तरी कऱ्हाड शहर व तालुक्याती राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)दिग्गजांच्या कऱ्हाडातल्या सभादिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून कऱ्हाडला राजकीयदृष्ट्या नेहमीच महत्त्व राहिले आहे़ दिवंगत इंदिरा गांधी, राजीव गांधी, विश्वनाथ प्रतापसिंग, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह सोनिया गांधींचीही यापूर्वी कऱ्हाडात सभा झाली आहे़ यशवंतरावांची कृष्णा घाटावर, इंदिरा गांधींची शहरातील कोयना दूध कॉलनीत तर राजीव गांधींची सभा गोळीबार मैदानावर झाली होती. इतर सभा स्टेडियमसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी झाल्या़