शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

कऱ्हाडमध्ये इंधन दरवाढ विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांची सायकल रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:12 PM

bycycle rally Prithviraj Chavan Congress Karad Satara : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी कऱ्हाड येथे कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेस व कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने सायकलरॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठळक मुद्देकऱ्हाडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची सायकल रॅली !पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध

कऱ्हाड : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी कऱ्हाड येथे कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेस व कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने सायकलरॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाडमधील कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून सायकल रॅलीची सुरुवात केली. ही रॅली पुढे येऊन दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे जाऊन भेदा चौक मार्गे शहरातील पोपटभाई शहा पेट्रोल पंपावर समारोप करण्यात आला.या रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव थोरात, जिल्हा काँग्रेस कायदे विभागाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, वैशाली वाघमारे, मलकापूर नगरसेवक राजेंद्र यादव, कऱ्हाडचे माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, प्रा. धनाजी काटकर, सतीश पाटील, शिवाजी जाधव, दिलीप देशमुख, मोहन शिंगाडे, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत जाधव, कऱ्हाड दक्षिण युवकचे अध्यक्ष अमित जाधव, कोळे ग्रामपंचायत सदस्य अभिजित चव्हाण, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ह्यमोदी सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आलेले आहे, महागाईच्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून महागाईचा डोंगर सामान्य जनतेसमोर उभा केला आहे.

कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना मोदी सरकार टॅक्स वाढवून ज्यादा पैसे सामान्य जनतेकडून उकळत आहे व याचे त्यांना काहीही सोयरसुतक दिसत नाही. आज इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे, यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.

यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर सायकल रॅली आयोजित करून निषेध नोंदविण्यात येत आहे. तसेच स्वाक्षरी मोहीम सुद्धा शहरी भागातील पेट्रोल पंपावर घेण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेचा रोष काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे व या आंदोलनातून आमची मोदी सरकारला मागणी आहे की इंधनाचे दर तातडीने कमी करावेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसbycycle rallyसायकल रॅलीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणKaradकराडSatara areaसातारा परिसर