शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याशी झुंज देत वाचविले लेकराचे प्राण, पृथ्वीराज चव्हाणांनी केले धाडसाचे कौतुक; शासन करणार उपचाराचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 19:14 IST

बिबट्याशी झुंज देत मृत्युच्या दाढेतूनही आपल्या लेकराचे वाचविले प्राण  

कऱ्हाड : किरपे (ता. कऱ्हाड) येथील धनाजी देवकर या शेतकऱ्याच्या मुलावर गुरुवारी (दि-२०) बिबट्याने हल्ला केला. यावेळी या धाडसी बापाने बिबट्याशी झुंज देत मृत्युच्या दाढेतूनही आपल्या लेकराचे प्राण  वाचविले. धनाजी देवकर यांच्या या धाडसाबद्दल माजी मुख्यमंत्री, कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून कौतुक करीत त्यांना धीर दिला.आमदार चव्हाण काही कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी फोनवरून त्या पित्याची चौकशी केली व त्यांना धीर देत मुलाच्या उपचाराचा खर्च शासन करील, असे सांगितले. तसेच चव्हाण यांनी वनअधिकाऱ्यांशी चर्चा करीत बिबट्याचा वारंवार होत असलेला उपद्रव टाळण्यासाठी वनविभागाने या भागात पिंजरे लावून बिबट्यांना पकडून जंगलात सोडण्याची व्यवस्था करावी. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा, असे सुचवले. याबाबत स्वतःसुद्धा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा वावर असलेल्या भागात जाऊन तेथील ग्रामस्थांचे भीतीचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चर्चा कराव्यात, तसेच पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशा सूचना आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.बिबट्याचा मानवी वस्तीत वाढत असलेला वावर यासाठी चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करीत वनविभागाकडून योग्य उपाययोजना बिबट्याचा वावर असलेल्या भागात केल्या जाव्यात. तसेच वनविभागाच्या तालुका अधिकाऱ्यांना पिंजरे लावण्याचे अधिकार दिले जावेत, तसेच कराड तालुक्यात संक्रमण उपचार केंद्र उभारण्याचा वनविभागाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून, त्यास तत्काळ मंजुरी मिळावी, अशा मागण्या पत्राव्दारे केल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर