शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कारागृहात बंदिवानाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 10:24 IST

सातारा येथील जिल्हा कारागृहातील एका बंदिवानाला मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बंदिवानांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. साहेबांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून बंदिवानाला मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा कारागृहात बंदिवानाला बेदम मारहाणसातजणांवर गुन्हा : खबऱ्या असल्याचा संशय

सातारा : येथील जिल्हा कारागृहातील एका बंदिवानाला मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बंदिवानांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. साहेबांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून बंदिवानाला मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.विष्णू भगवान केकाण, विजय बाळू माने, भारत कमलाकर जाधव, सुरज मारूती धस, आकाश खुशालसिंग चव्हाण, अतुल सतिश क्षीरसागर, शाम सहदेव यतानळकर (सर्व रा. जिल्हा कारागृह)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, रुपेश उर्फ पप्पू शिवाजी चव्हाण (रा. आभेपुरी, ता. वाई सध्या रा. जिल्हा कारागृह) हा कारागृहातील दवाखान्यात झाडलोट करण्याचे काम करतो. तो नेहमीप्रमाणे मंगळवारी दवाखान्यात झाटलोट करत असताना यातील संशयित केकाण हा दवाखान्यात आला होता.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला काही गोळ्या खाण्यास दिल्या व त्या त्यांच्यासमोरच खा, असे सांगितले होते. तरीही केकाणे हा गोळ्या खात नव्हता. त्यामुळे चव्हाण याने त्याला गोळ्या का खात नाहीस, असे विचारले, त्यामुळे चिडलेल्या केकाणे याने तू साहेबांचा खबऱ्या आहेस, तूला बघतोच, अशी धमकी दिली. त्यानंतर चव्हाण हा सायंकाळी सहाच्या सुमारास कारागृहातील बराक क्रमांक एक येथे गेल्यानंतर केकाणे याने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली.

यावेळी इतरही संशयितांनी चव्हाण याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर जखमी चव्हाण याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुन्हा त्याला कारागृहात नेण्यात आले. सातारा शहर पोलिसांनी कारागृहात जाऊन त्याचा जबाब नोंदवला असून, सहायक फौजदार एस. ई. पवार हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :jailतुरुंगSatara areaसातारा परिसर