शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

वाढे फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; सातजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:29 IST

वाढे फाटा येथील एका दुकानाच्या गोडाऊनच्या आडोशाला तीन पानी जुगार खेळणाऱ्या सातजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख २२ हजारांच्या पाच दुचाकीसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली.

ठळक मुद्देवाढे फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; सातजणांना अटक

सातारा : वाढे फाटा येथील एका दुकानाच्या गोडाऊनच्या आडोशाला तीन पानी जुगार खेळणाऱ्या सातजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख २२ हजारांच्या पाच दुचाकीसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली.

शैलेश दिनेश पटेल (वय २९, रा. केशव कॉम्पलेक्स वाढे फाटा, सातारा), नीलेश विकास भांडे (वय २८, गुरूदत्त कॉलनी विकास नगर सातारा), सुमीत राजेंद्र पवार (वय ३०), ओंकार अजय साळुंखे (वय २६, रा. वाढे फाटा, सातारा), चंद्रकांत लक्ष्मण साळुंखे (वय ३७, रा. सैदापूर फाटा, सातारा), रियाज उस्मान शेख (वय ४९, गुरूवार पेठ सातारा), अशोक विष्णू कांबळे (वय २७, रा. विकास नगर खेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, हे सर्वजण वाढे फाटा येथील एका दुकानाच्या गोडाऊनच्या आडोशाला तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्यानुसार या शाखेच्या टीमने गुरुवारी रात्री आठ वाजता तेथे अचानक छापा टाकला. त्यावेळी हे सर्वजण जुगार खेळताना रंगेहात सापडले. त्यांच्याकडून पत्त्याची पाने, मोबाईल, पाच मोटारसायकली, पत्त्याच्या डावातील रोख रक्कम, टेबल, खुर्च्या असा एकूण ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन.एस. कदम, सहायक फौजदार वाघमारे, साबळे, भोसले, पंकज ढाणे, ओंकार डुबल यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर