शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

साताऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट होणार, साॅफ्टवेअर खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता 

By नितीन काळेल | Updated: February 13, 2024 19:24 IST

सातारा : आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभेत ...

सातारा : आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभेत ८४ केंद्रांसाठी साॅफ्टवेअर खरेदीच्या प्रशासकीय मान्यतेवर चर्चा झाली. तसेच काही केंद्रातील दुरुस्ती, विस्तारीकरण आणि स्मार्ट केंद्र अनुषंगिक कामे करण्यासही मान्यता देण्यात आली. यामुळे स्मार्ट आरोग्य केंद्रासाठी आणखी एक पाऊल पुढे पडलंय.जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली ठराव समितीची बैठक झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायतच्या अर्चना वाघमळे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या क्रांती बोराटे, महिला व बालविकास विभागाच्या रोहिणी ढवळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, आदीसह अधिकारी उपस्थित होते.सभेत सुरूवातीला २९ जानेवारीला झालेल्या सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात येऊन मागील ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रिकेवरील विषयांना सुरुवात करण्यात आली. यामध्ये बांधकाम उत्तर विभागाकडील जिल्हा रस्ते विकास आणि मजबुतीकरणाच्या कमी दराच्या निविदा स्वीकारण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यात येणार आहेत. यासाठी ८६ लाख रुपये खर्चाच्या साॅफ्टवेअर खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच कऱ्हाड तालुक्यातील कोळे, पाटणमधील मुरुड आणि जावळी तालुक्यातील कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्यासाठीची अनुषंगिक कामे, प्रसुतीगृत, विस्तरीकरण, विद्युतीकरण, रंगकाम, पार्किंग आदींबाबत चर्चा करण्यात आली. तर वाई तालुक्यातील भुईंज आरोग्य केंद्र दुरुस्तीबाबतही मान्यता देण्यात आली.या सभेत बांधकाम उत्तर विभागाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच आयुर्वेदिक आणि युनानी दवाखान्यांचे बळकटीकरण, सोयीसुविधांत वाढ करणे, आयुर्वेदिक आैषधे पुरविणे आदींवरही चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर