शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

लम्पीचा प्रादूर्भाव; सातारा जिल्ह्यात जनावरांचा बाजार अन् वाहतूक बंद

By नितीन काळेल | Updated: August 28, 2023 18:50 IST

जनावरांचे प्रदर्शन, यात्रा, बैलगाडा शर्यतीचे आयोजनावर पुढील आदेशापर्यंत मनाई

सातारा : जिल्ह्याच्या शेजारील सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव वाढला असून साताऱ्यातीलही चार तालुक्यात ४१ जनावरे बाधित झाली आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्चभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने गोवर्गीय जनावरांचा बाजार अन् वाहतूक बंदचा निर्णय घेतला आहे. तसेच बैलगाडी शर्यतीवरही बंदी आली आहे.याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी आदेश निर्गमीत केला आहे. तर सातारा जिल्ह्या शेजारील सोलापूरमध्ये लम्पीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यातच जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली होती. याचदरम्यान, सातारा जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरे सापडत होती. पण, प्रमाण कमी होते. सध्या मात्र हळूहळू बाधित जनावरांची संख्या वाढली आहे. त्यातच फलटण तालुक्यात सुरुवातीला पशुधन बाधित झाले. त्यानंतर कऱ्हाड आणि माण तालुक्यातील जनावरांना लम्पी रोगाने गाठले.आता कोरेगाव तालुक्यातही बाधित जनावरे सापडली आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय बाजार तसेच गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या या आदेशानुसार जिल्ह्यातील आठवडा बाजारात गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री तसेच वाहतूक होणार नाही. तसेच जनावरांचे प्रदर्शन, यात्रा, बैलगाडा शर्यतीचे आयोजनही पुढील आदेशापर्यंत करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील फलटण, कऱ्हाड, कोरेगाव आणि माण तालुक्यातील ९ गावांमध्ये लम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. यामध्ये २६ गाई आणि १५ बैल असे मिळून ४१ जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर एका जनावराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लम्पीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५२ हजार ४३६ गोवर्गीय जनावरांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ३ लाख २३ हजार ६७ पशुधनाला लम्पी प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. उर्वरित जनावरांची लसीकरण मोहीमही वेगाने सुरु आहे. त्यामुळे गोवर्गीय जनावरांना लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगBull Cart Raceबैलगाडी शर्यत