जिल्ह्यात चौथ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:29 IST2021-06-02T04:29:11+5:302021-06-02T04:29:11+5:30

सातारा : जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी चौथ्या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस झाला, तर बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, बळीराजाला ...

Presence of pre-monsoon rains on the fourth day in the district | जिल्ह्यात चौथ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

जिल्ह्यात चौथ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

सातारा : जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी चौथ्या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस झाला, तर बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, बळीराजाला मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या होत असणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी खते आणि बियाण्यांची जुळवाजुळव सुरू आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. जिल्ह्याचे खरीप क्षेत्र सर्वसाधारणपणे साडेतीन लाख हेक्टरच्या पुढे आहे. यामध्ये सर्वच ११ तालुक्यात विविध पिके घेण्यात येतात. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टरच्या पुढे असते. तर यानंतर बाजरी, भात या पिकांचा समावेश होतो. तसेच भुईमूग, कडधान्येही काही प्रमाणात घेण्यात येतात.

जिल्ह्यात साधारणपणे १० जूनच्या आसपास मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. कमाल तापमानात उतार आला असून, थंड वारे वाहत आहेत. त्यातच जिल्ह्यात मागील तीन दिवस पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाने चांगली हजेरीही लावली तर, दुपारपर्यंत बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला.

जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण तयार झाले असल्याने सर्वांनाच मान्सूनची चाहूल लागली आहे. शेतकऱ्यांनीही खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी कृषी दुकानातून खते आणि बियाणे खरेदी करण्यात येत आहे.

.........................................................

Web Title: Presence of pre-monsoon rains on the fourth day in the district