शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीसाठी प्रहार जनशक्ती तीव्र आंदोलन करणार : खलाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:25 IST

सोलापूर जिल्ह्यातील १५०० कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपये एफआरपी रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम न जमा झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देएफआरपीसाठी प्रहार जनशक्ती तीव्र आंदोलन करणार : खलाटे साखर आयुक्त कार्यालयावर अचानक हल्ला बोल

सातारा : सोलापूर जिल्ह्यातील १५०० कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपये एफआरपी रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम न जमा झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.खलाटे म्हणाले, ऊस गेल्यानंतर कारखानदारांकडून १४ दिवसांत एफआरपीची रक्कम मिळणे बंधनकारक असतानाही गळीत हंगाम संपून चार महिने उलटल्यानंतर सुद्धा एफआरपीच्या रकमेपैकी १५०० कोटी रुपये अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ही रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह येत्या आठ दिवसांत मिळावी.शेतकऱ्यांना एफआरपी नुसार रक्कम मिळण्यासाठी शासनाने कारखान्यास कोणत्या दिवशी नोटीस पाठविली व त्या नोटीशीस कारखान्याकडून कोणते उत्तर मिळाले, ही माहिती शेतकऱ्यांना आॅनलाईन उपलब्ध व्हावी, यासाठी उपाय योजना व्हाव्यात. ऊसबिलासह इतर माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या अ‍ॅपची तातडीने अंमलबजावणी करावी.

या सर्व मागण्या आठ दिवसांत पूर्ण कराव्यात, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही पूर्व सूचना न देता साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाही खलाटे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर