शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला वीज पुरवणारे कोयनानगर अंधारात, दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:50 IST

कोयनानगर : राज्याला वीजपुरवठा करत असलेल्या कोयना जलविद्युत प्रकपाच्या कोयना धरणावरील काही भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ...

कोयनानगर : राज्याला वीजपुरवठा करत असलेल्या कोयना जलविद्युत प्रकपाच्या कोयना धरणावरील काही भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कोयनानगर गावाच्या काही भाग दोन दिवसांपासून अंधारात आहे. त्याचा तेथील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या परिसरातील पाणीपुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे अडचणीत आणखी वाढ झाली आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री घाटमाथ्यावर गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. जवळपास शंभर टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणातील पाण्यावर वीजपुरवठा होत असल्याने महाराष्ट्र प्रकाशमान होत आहे. मात्र, या परिसरातील नागरिकांना सध्या वेगळ्याच समस्यांनी ग्रासले आहे.कोयनानगरला पोफळी वीजनिर्मिती प्रकल्पाकडून वीजपुरवठा केला जातो. त्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याने विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे कोयनानगरमधील एका कॉलनीतील वीज गेलेली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम झालेला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न उद्भवणे ही गंभीर बाब आहे. मुलांना अंधारात अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे वीजपुरवठा व पाणी कधी पूर्ववत सुरू होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.