शेंद्रे : सातारा शहरापासून जवळच असणाऱ्या जकातवाडी हद्दीतील कुरणेश्वर मंदिर परिसरातील विद्युतवाहक खांब धोकादायक स्थितीत उभा आहे. वर्षापासून नागरिकांनी महावितरणकडे तक्रार करूनही हा खांब एका बाजूला पडण्याच्या स्थितीत आहे. मात्र, याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
हा विद्युत वाहक खांब सातारा शहरातील नागरिकांना फिरण्यासाठी करण्यात आलेल्या पादचारी मार्गालगतच आहे. तसेच जकातवाडी गावात जाण्यासाठी ज्याठिकाणी वाहनांना यू-टर्न घ्यावा लागतो, या परिसरात हा धोकादायक खांब असल्याने अपघाताची शक्यता आहे. यामुळे या धोकादायक विद्युत वाहक खांबासंदर्भात जकातवाडीचे सरपंच व ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला माहिती देऊनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महावितरणच्या प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष आहे.
(कोट..)
धोकादायक विद्युत खांबासंदर्भात महावितरण विभागाला वेळोवळी माहिती देऊनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या धोकादायक खांबामुळे परिसरात अपघाताचा धोका आहे.
-चंद्रकांत सणस, सरपंच जकातवाडी
०६शेंद्रे
फोटो :
कुरणेश्वर मंदिरासमोरील जकातवाडी हद्दीतील विद्युत खांब एका बाजूला कलल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.