शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

CoroanVirus Satara : श्रद्धांजलीच्या पोस्ट देताहेत तणावाला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 15:37 IST

CoroanVirus Satara : कोरोनाच्या महाभयंकर महामारीने शहरांसह ग्रामीण भागातही हातपाय पसरवले आहेत. माण तालुक्यातील खेड्यापाड्यात रुग्ण संख्या वाढत आहे. काही खबरदारी घेणारे जागृत नागरिक स्वतःसह कुटुंंबाचीही काळजी घेत आहेत. मात्र कोरोना बाधितांच्या आकड्यासह उपचार घेत असणाऱ्यांच्या मृतांचा आकडादेखील वाढत आहे. सहाजिकच सोशल मीडियावरून ओळखीच्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जातेय. यातून रुग्णांसह नातेवाईकांना मानसिक तणावाला निमंत्रण मिळत आहे.

ठळक मुद्देरुग्णांबरोबरच नातेवाईकांना धास्ती सोशल मीडियाचा वापर जपून करण्याची गरज

वरकुटे-मलवडी : कोरोनाच्या महाभयंकर महामारीने शहरांसह ग्रामीण भागातही हातपाय पसरवले आहेत. माण तालुक्यातील खेड्यापाड्यात रुग्ण संख्या वाढत आहे. काही खबरदारी घेणारे जागृत नागरिक स्वतःसह कुटुंंबाचीही काळजी घेत आहेत. मात्र कोरोना बाधितांच्या आकड्यासह उपचार घेत असणाऱ्यांच्या मृतांचा आकडादेखील वाढत आहे. सहाजिकच सोशल मीडियावरून ओळखीच्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जातेय. यातून रुग्णांसह नातेवाईकांना मानसिक तणावाला निमंत्रण मिळत आहे.आठवड्यातून तीन चारवेळा अशा पोस्ट वाचायला मिळत असल्याने, अनेकांना मानसिक तणावाला निमंत्रण मिळत आहे. सरकारी व खासगी कोरोना चाचणी अहवालानुसार शेकडोंच्या संख्येने जिल्ह्यासह तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनारुग्ण उपचार घेत आहेत. याबद्दल सोशल मीडियावर माण तालुका आरोग्य प्रशासन किंंवा अन्य कोणाकडून तरी वेळोवेळी माहिती कळते. सध्या जिकडे बघावे तिकडे फक्त कोरोनाबद्दलच चर्चा, माहिती, उपचार याबाबत बोलले जात आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी प्रत्येकांनीच देवांना साकडे घातले आहे.

कोणत्या रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल होत असते. निधन पावलेली व्यक्त त्या परिसरात ओळखीच्या असल्याने भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट प्रत्येकांच्या मोबाईलवर शंभरहून अधिक असणाऱ्या ग्रुपवर अनेकदा फिरली जाते. कोरोनामुळे याचे निधन झाले, त्याचे निधन झाले अशा चर्चा नेहमीच एकायला मिळते.सोशल मीडियावर निधन वार्तांची पोस्ट पडल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून काहीजण दु:ख व्यक्त करतात. तालुक्यात आठवड्यातून किमान तीन ते चार जणांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे कानावर पडते. अशा निधन पावलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात दिग्गज असतात अथवा तालुक्यात चांगल्यापैकी परिचित असतात. किंवा त्या व्यक्तीचा हजारो लोकांचा जनसंपर्क असतो.

कोरोनामुळे झालेल्या निधनाच्या भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्टदृष्टीस पडताच अनेकांना खोलवर वेदना होतात. मग तो जवळचा सलगीतला असलाच किंवा लहानपणाचा मित्र, सोबती, वर्गमित्र असल्यास त्याच्या सहवासातील जुन्या आठवणी उफाळून येवून अनेकजण खुप दु:खी होत आहेत. त्यातल्या त्यात कोरोनाने निधन झालेली व्यक्ती आपल्यापेक्षा कमी वयाची असल्यास तर काहींच्या मनामध्ये अचानकपणे भीतीची भावना नैसर्गिकरित्या निर्माण होत आहे.काहींनी व्हीडीओ बनवून त्यास भावनाविवश पार्श्वसंगीत दिलेले असते. त्यामुळे आणखीनच मनात दु:ख होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या परिवारात हे दु:ख झाले आहे, त्या परिवारास सांत्वन भेट देण्यासाठी सुद्धा कोरोना आजारामुळे त्यांंच्या घरी जाता येत नाही. याची मोठी सल असते. त्यामुळे सोशल मीडियावरून शेअर झालेल्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट वाचून अनेकांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूSatara areaसातारा परिसर