शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा- मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 21:09 IST

पाटण : गेल्या बावीस दिवसांपासून कोयनानगर येथे सुरू केलेल्या श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाची

पाटण : गेल्या बावीस दिवसांपासून कोयनानगर येथे सुरू केलेल्या श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनाधरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाची मुंबई येथे विधानभवन येथे सोमवारी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या महत्त्वाचे व ऐतिहासिक निर्णय घेतले गेले.

कोयनानगर येथील आंदोलक व शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेदरम्यान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव प्रवीण परदेशी, कोयना प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळातील डॉ. भारत पाटणकर, संपत देसाई, हरिश्चंद्र दळवी, चैतन्य दळवी, बळीराम कदम, संभाजी चाळके, संजय लाड, संतोष गोटल, सचिन कदम, महेश शेलार, शैलेश सपकाळ, भगवान भोसले, प्रकाश साळुंखे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. पाटणकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मूळ मागण्या कोणकोणत्या सकारात्मक चर्चेला घेतल्या आणि त्यावर कोणती-कोणती चर्चा झाली. त्याबाबत मंगळवार, दि. २० रोजी आंदोलनस्थळी धरणग्रस्तांच्या मेळाव्यात माहिती दिली जाणार आहे.गेल्या २२ दिवसांपासून कोयनानगर येथे केल्या जात असलेल्या ठिय्या आंदोलनाची तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला, अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोयना धरणग्रस्तांच्यावतीने श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी विविध मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी चंद्रकांत पाटील, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणministerमंत्री