शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परिचारिकांचे स्थान अढळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

‘नर्स डे’ची परंपरा १९५३ मध्ये सुरू झाली. तेव्हा अमेरिकेच्या आरोग्य, शिक्षण आणि कल्याण विभागाचे अधिकारी डोरोथी सदरलँड यांनी राष्ट्राध्यक्ष ...

‘नर्स डे’ची परंपरा १९५३ मध्ये सुरू झाली. तेव्हा अमेरिकेच्या आरोग्य, शिक्षण आणि कल्याण विभागाचे अधिकारी डोरोथी सदरलँड यांनी राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयसनहॉवर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘नर्स दिन’ जाहीर केल्याचा प्रस्ताव दिला. तथापि, त्यावेळी तो प्रस्ताव अमान्य झाला होता. आंतरराष्ट्रीय नर्स ऑफ कौन्सिलने १९६५ पासून १२ मे रोजी हा उत्सव साजरा केला होता.

आधुनिक नर्सिंगचा संस्थापक म्हणून व्यापकपणे विचारात घेतल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेलच्या जन्मोत्सवाच्यानिमित्ताने १२ मे ही सर्व परिचारिकांसाठी महत्त्वाची तारीख आहे. जानेवारी १९७४ मध्ये हा दिवस अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय परिचारिक दिन बनला. त्यानंतर दरवर्षी, आयसीएन आंतरराष्ट्रीय नर्सस डे किट नावाची एखादी वस्तू तयार करते आणि वितरित करते, ज्यामध्ये शैक्षणिक आणि सार्वजनिक माहिती, सामग्री असते. नर्स डे म्हणजे रुग्णांची काळजी घेणाऱ्या परिचारिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे.

दु:खाची गोष्ट म्हणजे, बरेच नागरिक परिचारिकांचे आभार मानण्यास दुर्लक्ष करतात. डॉक्टरांच्या आदेशांचे पालन करणारी केवळ एक कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र या दिवसानिमित्ताने आपण आपला दृष्टिकोनही बदलला पाहिजे. जर एखाद्या परिचारिकेने आपली काळजी घेतली असेल, तर त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.

काही लोक गंभीर अवस्थेत रुग्णालयात अनेक महिने दाखल असतात. त्यांची मानवतेच्या दृष्टीने सेवा करण्याचे खरे काम परिचारिका करत असतात. सध्याच्या कोरोनाच्या संकटात तर वैद्यकीय सेवेत त्यांचे कार्य अधिक ठळकपणे समाजापुढे आले आहे. आपला जीव धोक्यात घालून त्या सक्षमपणे आपली सेवा बजावत असतात. एका बाजूला कौटुंबिक जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला रुग्ण सेवेचे व्रत अशा दोन्ही भूमिका त्या सक्षमपणे निभावत असतात. आज त्यांच्या या कार्याला सलाम करण्याची आपणा सर्वांना संधी आहे.

दुर्दैवाने बऱ्याच लोकांना असे वाटते की, आरोग्य सेवा प्रणालीत सर्वात महत्त्वाचा घटक डॉक्टर आहेत. हे खरे असले तरी, परिचारिकांचेही स्थान आपण विसरून चालणार नाही. सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये रुग्णांच्या सेवेची जबाबदारी असणाऱ्या परिचारिका नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात.

सध्या आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेक जण या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छित असणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. गरजवंताचे संगोपन करणे, संवर्धन करणे, पोषण करणे तसेच त्यांना शिक्षण देण्याचे कार्य जी व्यक्ती करते, तिला ‘परिचारिका’ असे ढोबळ मानाने म्हणतात. सामाजिक आरोग्यसेवा पुरविणे, माता-बाल सेवा पुरविणे तसेच नर्सिंगसंबंधीचे प्रशासन तसेच व्यवस्थापन विषयक कामे पाहणे रुग्ण व नातेवाइकांना आरोग्य सल्ला देणे, अशी कामे त्यांना करावी लागतात. अलीकडे समुपदेशनाचे कार्यही परिचारिका करीत आहेत. हे क्षेत्र तरुणींसाठी जास्त सुरक्षित असल्याचे मानले जाते.

एक कुशल आणि कार्यक्षम नर्स बनण्यासाठी केवळ नि:स्वार्थ सेवेची भावना असून चालत नाही. पुरेशा प्रशिक्षणाची आणि अनुभवाचीदेखील गरज असते. ट्रेन्ड नर्स बनण्यासाठी एक ते चार वर्षांपर्यंत किंवा त्याहूनही अधिक वर्षांपर्यंत त्या विषयाचा कसून अभ्यास करावा लागतो आणि त्यासोबतच प्रॅक्टिकल ट्रेनिंगसुद्धा घ्यावे लागते.

टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे आणि प्रभावामुळे नर्सिंगच्या क्षेत्रातला दबाव अधिकाधिक वाढत आहे. कारण टेक्नॉलॉजी आणि माणुसकी (रुग्णांशी सौम्यतेने वागणे) यांचा मेळ बसवणे खरोखरच मोठे आव्हान आहे. नर्सला एखाद्या पेशंटबद्दल जी प्रेमळ काळजी आणि दया वाटते त्याची जागा कोणतेही यंत्र घेऊ शकत नाही.

- प्रतिनिधी

... तरीही ती झेलतेय हल्ले

सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा फैलाव केवळ संपर्कात आल्याने होत असतो. एखादा शिंकला तरी आपण नको ती शंका घेत असतो. त्यानंतर काळजी घेत असतो; पण रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या परिचारिका केवळ ‘आरोग्य सेवा हीच ईश सेवा’ असे समजून कर्तव्य बजावत आहेत. कोरोना वाॅर्डात काम केल्यामुळे आपणालाही संसर्ग होण्याचा धोका आहे, हे माहीत असून, त्या आपले काम करत असतात. रुग्णालयात दाखल झालेल्या बाधित, संसर्गित लोकांची सेवा करत असतात. यामध्ये रुग्णांची दररोज तपासणी करणे, त्यांचे नमुने घेणे, औषधे देणे, त्यांच्या तापाची नोंदी करणे, तब्बेतीतील सुधारणांबाबत अहवाल करण्याची कामे त्या करत असतात. कर्तव्य संपवून घरी गेल्यावर उंबऱ्याच्या हात पाय ठेवताच त्यांच्याही मनात धस्स होत असेल. अनेक जणी मुलांनाही जवळ घेत नाहीत. अशाप्रकारे स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या परिचारिकांना अनेक घरमालक घर सोडायला, वसाहती सोडण्यास भाग पाडत आहेत. काही ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झाल्याच्या घटना प्रसारमाध्यमातून पुढे आल्या. या बातम्या वाचल्यानंतर समाज त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो, हे समोर येतं. अन् तरीही त्या कर्तव्य बजावत असल्याने त्यांचे खरोखरच कौतुक वाटत असते.