शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: सातारा, कराडच्या महायुद्धात १८ उमेदवारांची परीक्षा!, पक्षश्रेष्ठींची राजकीय प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:40 IST

दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी प्रत्येक नऊ उमेदवारांमध्ये लढत

सातारा : राज्याच्या राजकारणात नेहमीच संवेदनशील ठरलेल्या सातारा आणि कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी नगराध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी नऊ, असे तब्बल १८ उमेदवार रिंगणात उतरल्याने स्थानिक नेतृत्वासह पक्षश्रेष्ठींची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या साताऱ्यात यंदाची लढत अत्यंत लक्षवेधी ठरली आहे. ५० सदस्यांची ही पालिका शहराच्या वाढीव हद्दीपर्यंत विस्तारल्याने, लोकनियुक्त नगराध्यक्षाला विस्तारित भागाच्या नेतृत्वाची मोठी संधी मिळणार आहे. येथील नगराध्यक्षपदाचा सामना थेट भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा होणार आहे.

भाजपने माजी नगरसेवक अमोल मोहिते यांना संधी दिली आहे. त्यांच्यासमोर, भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेल्या सुवर्णा पाटील यांनी महाविकास आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. या दोन राजकीय दिग्गजांच्या मुख्य लढतीमुळे साताऱ्याचा गड कोणाच्या ताब्यात जाणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अन्य अपक्ष उमेदवारांमुळे ही लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

कराड पालिकेत काटे की टक्कर !कराड नगरपालिकेत यंदाची निवडणूक भाजप, काँग्रेस व दोन स्थानिक आघाड्यांमध्ये होणार आहे. येथे यशवंत आघाडीचे राजेंद्र यादव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. भाजपने विनायक पावसकर यांना, तर काँग्रेसने झाकीर पठाण यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष उमेदवार रणजित पाटील यांनीदेखील रिंगणात उतरवून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले आहे. अनेक ताकदवर उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकल्याने, कराडच्या नेत्यांसाठी ही निवडणूक वर्चस्वाची लढाई बनली आहे. सत्तास्थापनेच्या निर्धाराने नेतेमंडळींनी प्रचारयंत्रणा कामाला लावली असली तरी निकालावरून नेतृत्वाचा प्रभाव सिद्ध होणार आहे.

रहिमतपूर-फलटणला घमासान !जिल्ह्यातील रहिमतपूर व फलटण नगरपालिकेत दोन-दोन उमेदवार समोरासमोर असल्याने येथे कडवी-झुंज पाहायला मिळणार आहे. फलटणमध्ये शिंदेसेनेकडून अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, तर भाजपकडून समशेरसिंह नाईक-निंबाळकर एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. रहिमतपुरात राष्ट्रवादीकडून नंदना सुनील माने, तर भाजपकडून वैशाली नीलेश माने यांना उमेदवारी देण्यात आली असून, येथे महायुतीअंतर्गत लढत होणार आहे. या दोन्ही पालिकांच्या निकालावर बरीच राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara, Karad Local Elections: 18 Candidates Vie, Prestige at Stake!

Web Summary : Satara and Karad municipal elections see 18 candidates vying for power. BJP faces Maha Vikas Aghadi in Satara. Karad witnesses a multi-cornered fight. Rahimatpur and Phaltan also brace for intense contests, impacting political equations.