शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सेवासमाप्त बळवंत पडसरेंच्या अंगावर ३० वर्षानंतर पोलिसाची वर्दी; नेमकं प्रकरण काय...वाचा

By नितीन काळेल | Updated: September 16, 2023 12:59 IST

‘ऑफ्रोह’च्या लढ्याला यश : अधीक्षकांकडून अधिसंख्य पदाचा आदेश

सातारा : वाई येथील बळवंत पडसरे पोलिस दलात असताना एक वर्षाच्या सेवेनंतर अनुसूचित जमाती पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. याविरोधात त्यांनी ‘ऑफ्रोह’ संघटनेच्या नेतृत्वाखाली लढा दिला. त्यामुळे ३० वर्षांनंतर का असेना डिसेंबर २०१९ मधील शासन निर्णयानुसार पडसरेंना न्याय मिळाला आहे. पोलिस अधीक्षकांनी अधिसंख्य पदाचा आदेश दिल्याने पडसरे यांच्या अंगावर आता पोलिसांची वर्दी आलेली आहे.                        याबाबत ऑफ्रोह संघटनेच्या वतीने देण्यात आलेली माहिती अशी की, महादेव कोळी समाजातील सेवासमाप्त कर्मचारी बळवंत पडसरे हे जिल्हा पोलिस दलात होते. १९८९-९० दरम्यान वाई येथे पोलिस म्हणून कार्यरत असताना एक वर्षाच्या सेवाकार्य कालावधीनंतर पुणे येथील अनुसूचित जमातीच्या पडताळणी समितीने निकाल देऊन त्यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. तर नोकरीसाठी पडसरेंनी ‘ऑफ्रोह’च्या नेतृत्वाखाली उपोषण केले. तसेच ‘ऑफ्रोह’च्या पाठपुराव्यानंतर बळवंत पडसरेंना न्याय मिळाला आहे.

पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी ११ सप्टेंबरला पडसरेंना अधिसंख्य पदाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांना आता पोलिसाची नोकरी मिळाली आहे. तर नोकरी गेल्यानंतर पडसरे यांनीअनेक ठिकाणी अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो असफल ठरलेला. ऑफ्रोहचे सातारा जिल्हाध्यक्ष तानाजी धुमाळ, सचिव वनदेव ठिगळे, उपाध्यक्ष मच्छींद्रनाथ माने, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा भारती धुमाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अंजली बेसके, सुरेश गायकवाड यांच्यासह साताऱ्याच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. दरम्यान, बळवंत पडसरे यांना न्याय मिळाला आहे. हे यश ऑफ्रोह सातारा शाखेमुळे प्राप्त झाले, अशी प्रतिक्रिया संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी दिली आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसwai-acवाई