शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

पोलिसांवर चोरानं पिस्तूल रोखलं, ‘गोळ्या झाडेन’

By admin | Updated: October 14, 2014 23:21 IST

वाढे फाट्यावर थरार : फ्लॅटमध्ये घुसलेल्या चोराला घरमालकानं कोंडलं; सातारा पोलिसांनी अक्कलहुशारीनं ताब्यात घेतलं !

सातारा : फ्लॅटमध्ये कोणी नसल्याचे पाहून एक चोरटा आतमध्ये घुसला. मात्र त्याच वेळी घरमालक घरात आल्याने चोरट्याचे पितळ उघडे पडले आणि सतर्क मालकाने बाहेरून दरवाजाला कडी लावली. चोरट्याने पोलिसांवरच पिस्तूल रोखल्याने एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी त्या चोरट्याचे समुपदेशन केल्याने अखेर दीड तासानंतर लोडेड पिस्तूल खाली टाकून त्याने शरणागती पत्करली. ही खळबळजनक घटना सकाळी अकरा साडेअकरा वाजता घडली.सातारा शहरापासून काही अंतरावरच वाढे फाटा आहे. या ठिकाणी मंगलमूर्ती रेसिडन्सी या अर्पामेंटमध्ये विजय विष्णू साबळे हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहातात. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. पत्नी आणि मुलगी सकाळी बाहेर गेली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास विजय साबळे परत घरी आले. त्यावेळी फ्लॅटचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. आपल्या घरात चोर शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अपार्टमेंटमधील युवकांना बोलावून घेतले. घरात घुसून चोरट्याला बदडायचे, असे ठरवून सर्व युवक एकत्र आले. हातात दांडकी घेऊन दोन युवकांनी दरवाजा उघडायला चोरट्याला भाग पाडले. दोन युवकांनी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या चोरट्याने त्यांच्यावर पिस्तूल रोखले. ‘पुढे आला तर उडवून टाकेन,’ अशी धमकी दिली. चोरट्याच्या हातात पिस्तूल असल्याचे पाहून धाडस करून घरात शिरलेले दोन युवक पळतच बाहेर आले. त्यानंतर घरमालकाने पुन्हा बाहेरून दरवाजाला कडी घातली. ओळखता येऊ नये, यासाठी चोरट्याने तोंडाला रुमाल बांधला होता.त्यानंतर शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर केवळ मोजकेच काही कर्मचारी हातात लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी चोरट्याच्या हातात खरोखरचे पिस्तूल असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांना या घटनेचे गांभीर्य सांगण्यात आले. त्यानंतर तेही तत्काळ बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून तेथे पोहोचले. चोरट्याने आतून दरवाजाला कडी लावली होती. पोलिसांनी खिडकीतून त्याच्याशी बोलणे सुरू केले. तुझ्या हातातील पिस्तूल खाली टाक, पोलिसांना शरण ये, असे पोलिसांनी त्याला सांगितले. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मी पिस्तूल खाली टाकणार नाही. मला बाहेर जाऊ द्या. तरच मी पिस्तूल खाली टाकेन. असे तो चोरटा सांगू लागला. ‘तुला आम्ही काही करत नाही. तुझ्या पिस्तुलातील गोळ्या त्यातून काढून तरी टाक,’ अशी पोलिसांनी त्याला विनंती केली. त्याने पोलिसांचे ऐकून पिस्तुलातील तीन गोळ्या हातात काढून घेतल्या. त्या गोळ्या पोलिसांनी त्याला जमिनीवर टाकायला लावल्या. मात्र एक गोळी त्याने पिस्तुलामध्ये ठेवली होती. तो कधीही गोळी झाडू शकतो, हे पोलीस जाणून होते. त्यामुळे सतर्कता म्हणून पोलिसांनी त्याच्यावरही पिस्तूल रोखून धरले. काहीवेळ त्याला बोलण्यात गुंतवून पोलिसांनी अखेर त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. तब्बल दीड तास सुरू असलेला या थरारक प्रकारावर पडदा पडला आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलीस ठाण्यात त्याला आणल्यानंतर त्याने राजेश, जगदीश अशी नावे सांगितली. सुरूवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने जगदीश पोपट दराडे (वय २०, रा. अकोले ता. इंदापूर) असे नाव सांगितले. पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर त्याचे नाव खरे असल्याचे पुढे आले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. जगदीशने थंड डोक्याने प्लॅन करून फ्लॅट फोडला. घर ‘साफ’ केल्यानंतर पळून जाण्यासाठी त्याने जैयत तयारी केली होती. अपार्टमेंटपासून काही अंतरावर त्याने त्याची दुचाकी उभी केली होती. मात्र, पोलिसांनी त्याचा डावपेच मोडून काढला. जगदीश दराडेला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे. (प्रतिनिधी)आॅन दी स्पॉटबुलेटप्रूफविना पोलिसांनी छाती केली पुढे !पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनीच केवळ बुलेटप्रुफ जॅकेट अंगात घातले होते. बाकीचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे, हवालदार वसंत साबळे, दादामीया शेख, जितेंद्र कांबळे, निलेश यादव हे सर्वजण बुलेटप्रुफ जॅकेटविनाच होते. फ्लॅटमधून या चोरट्याने पोलिसांवर पिस्तूल रोखून धरले. मात्र निधड्या छातीचे हे कर्मचारी धाडसाने त्याच्यासमोर उभे राहिले. ‘आम्हाला गोळी घातलीस तर तुलाही गोळी घालेन,’ असा पवित्रा घेऊन या सर्वांनी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळेच जगदीश दराडेने पिस्तूल खाली टाकून अखेर शरणागती पत्करली. जादा कुमक येईपर्यंत या सर्वांनी त्या चोरट्याचा डाव फोल ठरविला. हायफाय मित्रांसारखे बनण्यासाठी चोरीजगदीशचे मित्र हायफाय वागत आहेत. उच्चभ्रू मित्रांबरोबर कायम त्याचा वावर असल्याने त्याला मित्रांसारखे राहाण्याची सवय लागली. त्यासाठी त्याने चोरी करण्यास सुरूवात केली. चोरी करून मिळविलेल्या पैशाची तो उधळपट्टी करायचा. चोरलेले सोने कवडीमोल किमतीने तो सोनारांना विकत होता. वास्तव्य बारामतीत, चोऱ्या साताऱ्यात ..! जगदीश दराडे हा हा बारामतीमध्ये वास्तव्यास आहे. त्याला वडील, भाऊ आहे. काही वर्षापूर्वी आईचे निधन झाले आहे. तो सोळा वर्षाचा असताना त्याने अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. काही महिने तो बाल सुधारगृहातही होता. मात्र १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याने घरफोड्या करण्यास सुरूवात केली. फलटण, माण, खटाव, बारामती, पुणे, सातारा या ठिकाणी आत्तापर्यंत त्याने घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. दहावी नापास असलेल्या जगदीशने जास्तीत- जास्त चोऱ्या सातारा जिल्ह्यात केल्या आहेत. विशेष म्हणजे चोरी करून पळून जाण्यासाठी त्याने नवीकोरी पल्सर विकत घेतली. त्याच्या गाडीचे अद्याप पासींगही झाले नाही.म्हणे,‘वेळ आलीच तर मर्डरही करेन..!’राजस्थानवरून पिस्तूल खरेदी केल्याचे जगदीशने पोलिसांना सांगितले आहे. लोकांना धमकावण्यासाठी पिस्तूल असावे, म्हणून त्याने पिस्तूल खरेदी केले. मात्र, यदाकदाचीत वेळ आलीच तर मर्डरही करण्यास मी मागे पुढे पाहिले नसते, अशी खळबळजन कबुलीही त्याने पोलिसांजवळ दिली. वेळीच त्याला सातारा पोलिसांनी रोखल्याने मोठा अनर्थ टळला.बुलेटफ्रुप जॅकेटचा पहिल्यांदाच वापर२६ नोव्हेंबरला मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर त्यामध्ये अनेक अधिकारी, पोलीस शहीद झाले होते. त्यावेळी निकृष्ट बुलेटप्रुफ जॅकेटमुळे अधिकाऱ्यांना प्राणाला मुकावे लागले. हा मुद्दा त्यावेळी बराच गाजला. त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना बुलेटफ्रूप जॅकेट देण्यात आली. हेच जॅकेट आज सातारा पोलिसांच्या उपयोगात आले. सीआयडीचा नव्हे, सातारचा दया...!सीआयडी मालिकेतील दृश्यांप्रमाणेच मंगळवारी सातारा पोलीस दलातील ‘दया’ने सर्वांना चकित केले. त्याचे नाव आहे, नीलेश यादव. सीआयडी मालिकेतील दयाप्रमाणेच नीलेशही हट्टाकट्टा. फ्लॅटमध्ये दडलेला चोरटा बऱ्याच वेळा बाहेर येत नाही, हे जेव्हा समजले. तेव्हा नीलेशने दरवाजावर जोरदार एक लाथ मारली आणि चक्क दरवाजा उघडला गेला.