फलटण : फलटण शहरातील मंगळवार पेठ येथे सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दीड टन मांस, दोन चारचाकी वाहने असा एकूण ९ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंगळवार पेठेतील कत्तलखान्यातून मोठ्या प्रमाणात मांस असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकून इरफान कुरेशी, नय्युम कुरेशी व त्यांच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतले.
घटनास्थळी सुमारे दीड टन मांस आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत मांस, कत्तल करण्यासाठी आणलेली जिवंत जनावरे, मांस वाहतूक करणारी दोन चारचाकी वाहने, एक दुचाकी असा एकूण ९ लाख १० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.