शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

खुनाच्या अफवेने पोलीस कामाला-मायणीत घबराट;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 19:39 IST

 मायणी : मायणी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रविवारी दिवसभर रंगायला लागली. ही कुणकूण पोलिसांपर्यंतही पोहोचली. पोलिसांनी तातडीने दखल घेत माहिती गोळा केली; पण खून कोठे झाला? याची माहिती हाती लागेना. त्यामुळे त्यांनी सर्व वस्त्या पिंजून काढल्या. हाती काहीच न लागल्याने अफवा असल्याचे निष्पन्न झाले.मायणी परिसरात असलेल्या भिकवडीरोड, ...

ठळक मुद्दे परिसरातील सर्व वस्त्या पिंजून पथके आले रिकामे

 

मायणी : मायणी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रविवारी दिवसभर रंगायला लागली. ही कुणकूण पोलिसांपर्यंतही पोहोचली. पोलिसांनी तातडीने दखल घेत माहिती गोळा केली; पण खून कोठे झाला? याची माहिती हाती लागेना. त्यामुळे त्यांनी सर्व वस्त्या पिंजून काढल्या. हाती काहीच न लागल्याने अफवा असल्याचे निष्पन्न झाले.मायणी परिसरात असलेल्या भिकवडीरोड, माळीनगर रोड, जमादार मळा या परिसरामध्ये लोकवस्ती असणाऱ्या अनेक वस्त्या आहेत. यावस्त्यांवर रात्री खून झाला असल्याची माहिती मिळत होती. वस्तीवर राहणारे लोक आपल्या वस्तीत नसून दुसºया वस्तीवर काहीतरी झाले आहे. दुसºया वस्तीवरचे तिसºयाच वस्तीवर खून झाल्याची चर्चा करत होते. हळूहळू ही बातमी संपूर्ण गावात पसरली. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दबक्या आवाजात खुनाविषयी चर्चा सुरू झाली.पोलीस प्रशासनापर्यंत ही वार्ता रविवारी रात्री पोहोचली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी परिसरातील सर्व वाड्यावस्त्या फिरून चौकशी केली. कोठेच काही पुरावे हाती लागले नाहीत. त्यामुळे ही अफवा असावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र खुनाची अफवा असली तरी संपूर्ण परिसरात दिवसभर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

खून झाल्याची माहिती आमच्यापर्यंत आली होती. आमचे सर्व कर्मचारी त्या-त्या ठिकाणी पाठवून परिसरातील माहिती गोळा केली. मात्र ही अफवा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे लोकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी केले.

 

परिसरातील जमादार मळा या ठिकाणी रविवारी रात्री खून झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. त्या चर्चेच्या आधारे गावामध्ये असणारे तीन जामदार मळे, भिकवडी रोड आदी ठिकाणी राहणाºया ग्रामस्थांकडे चौकशी केली. मात्र असं काही घडलंच नाही, असं उत्तर मिळालं.- प्रशांत कोळी,पोली स पाटील, मायणी. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcrimeगुन्हे