शहरं
Join us  
Trending Stories
1
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
2
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
3
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
4
LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
6
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
7
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
8
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
9
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
10
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
11
maratha andolan: आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन
12
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
13
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
14
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
15
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
16
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
17
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
18
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
19
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
20
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू

दरोडेखोरांच्या नावावर पोलिसांची ‘जंगल सफर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:55 IST

चांदोली अभयारण्यात दरोडेखोर डेरेदाखल झालेत, असं खुद्द पोलिस अधिका-यांचे गोपनीय पत्र वन आणि वन्यजीव विभागाच्या हाती पडलं. या पत्रानं वनाधिका-यांच्या काळजात अक्षरश: धस्स झालं.

क-हाड ( सातारा )  : चांदोली अभयारण्यात दरोडेखोर डेरेदाखल झालेत, असं खुद्द पोलिस अधिका-यांचे गोपनीय पत्र वन आणि वन्यजीव विभागाच्या हाती पडलं. या पत्रानं वनाधिका-यांच्या काळजात अक्षरश: धस्स झालं. आता दरोडेखोरांना पकडायचं म्हटल्यावर ‘फिल्डिंग’ तर लावावी लागणार. त्यामुळे वनखातंही सज्ज झालं; पण जेव्हा या प्रकाराची सखोल चौकशी झाली, त्यावेळी पोलिसांची ही ‘सर्च मोहीम’ म्हणजे निव्वळ बनवाबनवी असल्याचं समोर आलं. पोलिस अधीक्षकांना जंगल      सफर करायची होती. त्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा भांडाफोड वन्यजीव विभागाने केलाय. पोलिस खातं जे करायचं ते बोलून दाखवित नाही. आणि बोलतं ते करत नाही, असाच आजपर्यंतचा अलिखित नियम. पोलिसांच्या दप्तरी गोपनीयतेला महत्त्व. आजपर्यंत अनेक मोहिमा पोलिसांनी गोपनीयता राखून फत्ते करून दाखविल्यात. अशाच एका नव्या मोहिमेची गोपनीय माहिती पोलिसांनी वन्यजीव विभागाला दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक विनीता व्यास यांना ८ सप्टेंबर रोजी इस्लामपूरच्या पोलिस उपअधीक्षकांकडून त्याबाबतचं पत्र प्राप्त झालं. 

सांगली जिल्ह्यात वन्यजीव हत्या तसेच वनसंपत्तीची चोरी, नासधूस झाल्याबाबत अनेक गुन्हे दाखल असल्याचे त्या पत्रात म्हटले होते. वन्यजीवांची हत्या करणारे संशयित चांदोली अभयारण्यात लपून बसले असण्याची शक्यताही पत्रामध्ये व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे ९ ते १० सप्टेंबर दरम्यान अभयारण्याच्या काही भागांत पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये ५० अधिकारी व १०० पोलिस कर्मचारी शोध मोहीम राबविणार असून, त्यामध्ये वन्यजीवच्या अधिकारी व कर्मचाºयांनाही सहभागी करावे, अशी विनंती त्या पत्राद्वारे करण्यात आली होती. 

सह्याद्रीच्या उपसंचालक विनीता व्यास यांनी हे पत्र मिळताच तातडीने उलट टपाल पाठवून पोलिसांना अभयारण्यात प्रवेश नाकारला. ज्या गुन्ह्यासाठी आपण ही शोध मोहीम राबविणार त्या गुन्ह्याची माहिती आम्हाला द्यावी. त्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करता येईल, असे उपसंचालक व्यास यांनी पोलिसांना सूचविले. 

दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मणदूर वनपालांना पोलिसांनी वारणावती येथील लघुपाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहामध्ये बोलावून घेतले. त्याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. 

वनपालांनी त्याबाबत विचारणा केली असता जिल्ह्यातील गुन्ह्यांसंदर्भात पोलिस अधीक्षक अधिकाºयांची बैठक घेत असल्याचे त्यांना सांगितले गेले. तसेच बैठकीनंतर पोलिस अधीक्षक अभयारण्यातील झोळंबी सडा याठिकाणी जाणार असल्याचेही सांगण्यात आले. वनपालांनी परवानगीबाबत विचारणा केली असता त्यांना त्याबाबत काहीच सांगण्यात आले नाही. काही वेळानंतर पोलिस अधीक्षकांनी वनपालांना बोलावून घेतले. ‘अभयारण्यात जाण्यास आम्हाला कोणाची परवानगी लागत नाही. मी स्टाफसह उद्यानात जाणार,’ असे अधीक्षकांनी वनपालांना सुनावले. त्यामुळे वनपाल तेथून थेट चांदोली बुद्रुक येथील अभयारण्याच्या गेटजवळ गेले. गेट बंद करून ते त्याचठिकाणी थांबले. जंगल सफरबरोबरच पोलिस अधीक्षकांना वारणा धरणातील बॅक वॉटरमध्ये नौकाविहार करायचा होता. त्यासाठी सांगलीहून टेम्पोमधून खास बोटीही आणण्यात आल्या होत्या. मात्र, वन विभागाच्या अधिकाºयांनी त्या बोटी पाण्यात उतरविण्यास अटकाव केला. अखेर दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या गाड्यांचा ताफा आरळा, शिलूरमार्गे उदगिरी भागामध्ये निघून गेला. या सर्व प्रकाराबाबत मणदूर वनपालांचा जबाब घेण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांना जंगल सफर करायची होती, असे वनपालांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वीच वनपालांना फोनसांगलीचे पोलिस अधीक्षक चांदोली परिक्षेत्रातील झोळंबी याठिकाणी नैसर्गिक फुलांच्या भागात फिरण्यासाठी येणार असल्याची माहिती दि. ७ सप्टेंबर रोजीच मणदूर वनपालांना फोनवरून देण्यात आली होती. कोकरूड पोलिस ठाण्याच्या अधिकाºयांनी फोन करून त्याबाबत कळविले होते. मात्र, वनपालांनी याबाबत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक व्यास यांच्याशी पत्र व्यवहार करून पूर्वपरवानगी घ्या, असे त्या अधिकाºयाला सांगितले. त्यानंतर दरोडेखोर लपल्याची बनवाबनवी करीत पोलिसांनी परवानगी मिळविण्याचा घाट घातल्याचे मणदूर वनपालांच्या जबाबतून समोर आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर