शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पोलिस आले... खोंडांसह पळा पळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : राज्यात बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी असताना देखील रविवार हा शासकीय सुटीचा वार पाहून बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथे गावच्या माळावर भर उन्हात सुरू असलेल्या बैलगाडीची शर्यत पोलिसांनी बंद पाडली. पोलिस आल्याचे दिसताच, बैलगाडीसह खोंडांना घेऊन मालकांनी थेट डोंगरातच पलायन केले. पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी शौकिनांनी भर रस्त्यातच ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : राज्यात बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी असताना देखील रविवार हा शासकीय सुटीचा वार पाहून बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथे गावच्या माळावर भर उन्हात सुरू असलेल्या बैलगाडीची शर्यत पोलिसांनी बंद पाडली. पोलिस आल्याचे दिसताच, बैलगाडीसह खोंडांना घेऊन मालकांनी थेट डोंगरातच पलायन केले. पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी शौकिनांनी भर रस्त्यातच चपला, बुट टाकून डोंगर माथाच गाठला. एकूणच माळावर ‘पोलिस आले.... पळा... पळा..’चाच कालवा होता.जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात बैलगाडी शर्यत शौकिनांची संख्या सर्वाधिक आहे. कायद्याच्या जाचक अटींमध्ये शर्यती अडकल्याने शौकिनांमध्ये भली मोठी नाराजी आहे. अनेकांनी एकाहून अधिक सरस खोंड सांभाळले असून, त्यांच्या रतिबावर दरमहा लाखो रुपये खर्च करीत आहेत. आज नाही तर उद्या शर्यती सुरू होतील, या भाबड्या आशेवर शौकीन आहेत. कधीही बैलगाडी शर्यती सुरू झाल्यास, आपली तयारी असावी, यासाठी चोरी छुपे सराव केले जात असून, त्याबाबत मोठी गुप्तता पाळली जात आहे. त्यातून काही हौशी शौकीन कायद्याच्या पळवाटा शोधून आणि सलग येणाºया शासकीय सुट्या गाठून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करीत असल्याने शौकिनांची पावले आपोआपच तिकडे वळतात. बोरजाईवाडीतही असाच प्रकार घडला. सकाळपासून खोंडांना घेऊन वाहने चिमणगाव मार्गे बोरजाईवाडीच्या माळाकडे कूच करीत होती. साधारणत साडे अकराच्या सुमारास शर्यतींना सुरुवात झाली, तोच जागरूक नागरिकांनी मंत्रालयातील बैलगाडी शर्यत प्रतिबंधक विभागाचे उच्चपदस्थ सनदी अधिकारी अनिल कटारिया व सातारा येथील पोलिस नियंत्रण कक्षाला मोबाईलवरून संपर्क साधून, बैलगाडी शर्यत सुरू असल्याचे कळविले. कटारिया व नियंत्रण कक्षाने कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांना कारवाईचे आदेश दिले.पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कूच करीत थेट बोरजाईवाडीचा माळ गाठला. पोलिसांनी शर्यतीच्या तळावर उभी असलेली वाहने व बैल ताब्यात घेतले. सर्वच वाहने थेट पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आली. त्यानंतर एक-एक करत खोंड मालक आणि वाहनाशी संबंधित पोलिस ठाण्यात जमू लागले. पोलिसांनी वाहनातून उतरविलेल्या खोंडांचा सर्वप्रथम पंचनामा केला आणि संबंधित व्यक्तीच्या ताब्यात दिला. जो गुन्हाशी संबंधित आहे, त्याच्या सहकाºयाच्या ताब्यात खोंड देण्यात आला, तशी रितसर पोहोचपावती घेण्यात आली. खोंडांना चालवित संबंधित व्यक्ती इतर वाहनाच्या शोधार्थ सातारा जकात नाक्याकडे घेऊन गेली.अनेकांनी पाहिली पोलिस जाण्याची वाट...पोलिसांना पाहताच बैलगाडी शर्यतीचे आयोजक, शौकीन, बैलगाडी मालक व चालकांची बोबडी वळाली. पोलिस आले... पळा.. पळा... चा आवाज भर उन्हात माळावर घुमला आणि एकच पळापळ सुरू झाली. पोलिसांनी काठ्या घेऊन पाठलाग करताच अनेक जण खोंडांना घेऊन थेट डोंगर माथ्यावर जाऊन बसले. चपला, बूट आणि सँडलचा तर पायवाटेवर सडाच पडला होता. अनेकांनी आपली वाहने सोडून पळ काढला. उन्हाच्या तडाख्यात डोंगर माथ्यावर बसून पोलिस जाण्याची वाट पाहात होते.टेम्पोेच्या चाकातील हवा सोडलीपोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार महादेव खुडे, नाईक रियाज शेख, सचिन साळुंखे, गोरखनाथ साळुंखे, महादेव आळंदे, शिपाई किशोर भोसले व चालक पोलिस नाईक राहुल पवार यांनी बोरजाईवाडीच्या माळरानावर शर्यत रोखताना पळून जाऊ नका, असा इशारा दिला होता. मात्र, पोलिस आल्याने आता कारवाई होणार या भीतीने सर्वांनीच पळ काढला. जो तो पळत सुटला असल्याने पोलिसांनी वाहनांवर कारवाईस सुरुवात केली. तेथे असलेला एक टेम्पो कोणाचा आहे, अशी विचारणा केल्यावर एकानेही उत्तर दिले नाही. अखेरीस पोलिस पथकाने त्याच्या चारही चाकांतील हवा सोडून दिली.