सातारा : विविध मागण्यांसाठी सातारा आशा वर्कर्स युनियनचा जिल्हा परिषदेवर निघालेला मोर्चा शहर पोलिसांनी रोखला. या मोर्चात दोन हजारांहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
आशा वर्करच्या महिलांनी जीव धोक्यात घालून समाजाची सेवा केली आहे, त्यांना मानधनावर सरकार राबवून घेत आहे. याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापासून जिल्हा परिषदपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक आशा वर्कर्स सामील झाल्या होत्या. मात्र यासाठी संघटनेने परवानगी काढली नसल्याने पोलिसांनी मध्येच मोर्चा अडविला.
पोलिसांनी निघालेल्या आशा वर्करचा मोर्चा थांबवल्यानंतर अटक करा पण न्याय द्या. आशा वर्कर्सने घेतलेली भूमिका. जिल्ह्यात संचारबंदीना शीतलता दिली असली तरी जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून साताऱ्यात विविध मागण्यांसाठी आशा वर्करचा निघालेला मोर्चा सातारा शहर पोलिसांनी जिल्हा परिषद येथे धुडकावून लावला. मात्र आम्हाला अटक झाली तरी चालेल पण न्याय द्या अशी भूमिका आशा वर्कर्स घेतल्याने या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता आणि विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील जवळपास दोन हजारांहून अधिक आशा वर्कर्स यांनी मोर्चा काढून जिल्हा परिषदेवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी १४४ कलम लागू असल्याने मोर्चा काढून महिलांना देण्याची विनंती केली. मात्र शासनाकडून आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करा, अटक केली तरी चालेल, पण आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. अशी आशा वर्करची भूमिका घेतल्याने या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा आला व सर्व महिलांना रस्त्याच्या बाजूला घेऊन रहदारीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. आंदोलकांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांची बोलण्याची संधी देण्यात आली.
आशा सेविकांना आधुनिक मोबाईल द्यावा, पुरेशा प्रमाणामध्ये सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोज देण्यात यावेत, आरोग्यसेविका भरतीमध्ये आशा वर्कर्स ५० टक्के आरक्षण देण्यात यावे, आदी मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
फोटो ओळ : सातारा येथे पोलिसांनी आशा वर्करचा मोर्चा रोखला. (छाया : जावेद खान)