शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

कऱ्हाडात आठ व्यापाऱ्यांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST

शहरासह तालुक्यात कोरोना संसर्ग उग्र स्वरूप धारण करीत आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन ...

शहरासह तालुक्यात कोरोना संसर्ग उग्र स्वरूप धारण करीत आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार व्यापारी, विक्रेत्यांना सूचना दिल्या जात आहेत. मात्र, तरीही काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगसह इतर सूचनांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येते. शनिवारी दुपारी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.आर. पाटील हे मुख्य बाजारपेठेतून जास्त असताना त्यांना एका कापड दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दुकानात पाचपेक्षा जास्त जणांना प्रवेश देण्यास मनाई आहे. असे असतानाही संबंधित दुकानात गर्दी असल्यामुळे निरीक्षक पाटील यांनी पालिकेच्या पथकाला बोलावून संबंधित दुकान मालकास तीन हजाराचा दंड केला. तसेच सात दिवसांसाठी दुकान सील केले. अन्य सात दुकानांवरही पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने अशीच धडक कारवाई केली. शहरातील एकूण आठ दुकाने सील करण्यात आली असून प्रत्येकी तीन हजाराप्रमाणे एकूण २४ हजारांचा दंडही दुकानदारांना करण्यात आला आहे. या कारवाईने इतर व्यापारी व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

- चौकट

ध्वनिक्षेपकावरून पोलिसांचे आवाहन

सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या इतर नियमांबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नियम न पाळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी सूचना पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे शहरातील मुख्य बाजारपेठेत करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

- कोट

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळता दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांची गर्दी केल्यास संबंधित दुकानांवर यापुढेही कारवाईची मोहीम सुरूच ठेवली जाणार आहे. व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

- बी. आर. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

फोटो : ०३केआरडी०६

कॅप्शन : कऱ्हाडातील मुख्य बाजारपेठेत कारवाई करून पोलिसांनी कापड दुकान सात दिवसांसाठी सील केले.