शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

शिराळ्यात पोलीस-काँग्रेस नेत्यांत धक्काबुक्की

By admin | Updated: September 13, 2015 00:17 IST

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोर्चा : तहसील कार्यालयात मेंढरे सोडली, केंद्र व राज्य शासनावर टीका

सागाव : शिराळा येथे कॉँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, प्रदेश कॉँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले. यावेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना राज्य सरकारमधील मंत्री बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी यापुढील काळात रस्त्यावर उतरून संघर्षासाठी कॉँग्रेस कायकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले. या मोर्चामध्ये मेंढरासह शेतकरी मोठ्या संख्येने होते. शिराळा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मेंढरे सोडण्यात आली. यावेळी अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस हिंमत सिंग, प्रदेश कॉँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख, राहुल आवाडे, धु्रवीताई लाकडे प्रमुख उपस्थित होते. स्वागत विधानसभा युवक अध्यक्ष प्रजित यादव यांनी केले. प्रास्ताविक हातकणंगले लोकसभा युवक अध्यक्ष जयराज पाटील यांनी केले. यावेळी कदम म्हणाले, भाजप सरकार हे उद्योगपतींचे सरकार आहे. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी युवक कॉँग्रेसने पुढाकार घेतला असून, भूमी अधिग्रहण कायदा केंद्राने मागे घेतला. हा विजय कॉँग्रेसचाच आहे. राज्यामध्ये शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर आहेत. हे शेतकऱ्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. पंतप्रधान मन की बात करत फिरत आहेत. आता मन की बात बास, आता कामाचे बोला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपचे मंत्री तोंडाला येईल ते वक्तव्य करत फिरत आहेत आणि ते भाजपचे नेतृत्व करत फिरत आहेत आणि ते भाजपचे नेतृत्व डोळ्यानी पाहत आहे. स्वातंत्र्य लढ्यानंतर कॉँग्रेसने दिलेले अधिकार हे सरकार मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारला जाग आणण्यासाठी संघर्ष हाच पर्याय आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात म्हणूनच लढवायच्या आहेत. या जोमाने कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम करावे. शिराळ्याच्या नागपंचमीस गतवैभव प्राप्त करण्यासाठी युवक कॉँग्रेस रस्त्यावर उतरेल, अशी ग्वाही कदम यांनी देत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊ, असे कदम म्हणाले. यावेळी हिम्मत सिंग म्हणाले, नरेंद्र मोदी लबाड व बोलणारे पंतप्रधान असून, आंदोलने, मोर्चे काढल्याशिवाय या सरकारकडून काहीही मिळणार नाही. भाजपची लबाडी जास्त दिवस चालणार नाही. यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले, भाजप सरकार झोपेचे सोंग घेऊन काम करत आहे. ते हुकूमशाही पद्धतीने गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे, ती कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. जनतेचा खोटा कळवळा दाखविणारे खासदार व आमदार यांची आता आंदोलने कुठे गेली आहेत. दुष्काळाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असताना प्रशासनाने कोणतेही पंचनामे केलेले नाही, ते करून नुकसानभरपाई द्यावी, केशरी रेशनकार्डवरील धान्य सुरू करावे, शिराळ्याच्या नागपंचमीला गतवैभव मिळवून द्यावे. तालुक्याच्या अनेक मागण्या केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता करण्यात यावी. यावेळी तालुका कॉँग्रेस अध्यक्ष हणमंतराव पाटील, संपतराव देशमुख, इंद्रजित साळुंखे, सभापती चंद्रकांत पाटील, राजीव मोरे, प्रतापराव यादव, महादेव कदम, के. डी. पाटील, जितेंद्र पाटील, जयकर कदम, किरण चव्हाण, रणजित पाटील, धनराज पाटील, विजय पवार, आनंदराव पाटील, अभिजित पाटील, शंकर कदम, तानाजी कुंभार, संदीप जाधव, विकास नांगरे, पोपट पाटील आदी उपस्थित होते. सत्यजित पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)