शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

वनविभागाच्या मोबाईलवर ‘द्या शिकारीची माहिती पटकन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 23:01 IST

सातारा : वन्यजीवांचे संरक्षण अन् पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेतले जात असताना आता वनविभागाची अनोखी ‘कॉलरट्यून’ नागरिकांमध्ये प्रबोधन करू लागली आहे

सचिन काकडे ।सातारा : वन्यजीवांचे संरक्षण अन् पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेतले जात असताना आता वनविभागाची अनोखी ‘कॉलरट्यून’ नागरिकांमध्ये प्रबोधन करू लागली आहे. वन अधिकारी व कर्मचाºयांना फोन लावताच त्यांच्या मोबाईलवरून ‘वन्यजीवांचे करू संरक्षण, द्या शिकारीची माहिती पटकन’ असे बोल कानी पडू लागले आहेत.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्याला निसर्गाचे अनमोल वरदान लाभले आहे. जिल्ह्यात ज्याप्रमाणे अनेक दुर्लभ वृक्ष, वनस्पती आढळतात, त्याचप्रमाणे पशुपक्षी व प्राण्यांचे अस्तित्व आजही टिकून आहे. मात्र, बेसुमार वृक्षतोड व शिकारीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून, पशुपक्ष्यांच्या अधिवासावरही संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास रोखण्याबरोबरच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाच्या वतीने नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे.

आजपर्यंत सूचनाफलक, पोस्टर आदींच्या माध्यमातून नागरिकांना वृक्षांचे महत्त्व पटवून दिले जात होते. वन्यजीवांचे संरक्षण व्हावे, याची माहिती दिली जात होती. मात्र, आता याही पुढे जाऊन वनविभागाची प्रबोधनाचा नवा मार्ग स्वीकारला आहे. जिल्ह्यातील वनअधिकारी व कर्मचाºयांच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर नागरिकांना ट्रिंग..ट्रिंग... असे ऐकू न येता प्रबोधनात्मक कॉलरट्यून ऐकू येऊ लागली आहे.‘वन्यजीवांचे करू संरक्षण, द्या शिकारीची माहितीशिरता प्राणी गावा येथे कळवा’ असे या कॉलरट्यूनचे शब्द असून, ही कॉलरट्यून नागरिकांमध्ये जनजागृती करू लागली आहे. जिल्ह्यातील १४८ वनरक्षक व ४८ वनपाल यांच्या शासकीय मोबाईल नंबरवर शासनाच्या वतीने ही कॉलरट्यून सुरू करण्यात आली आहे.हा आहे संदेश...

कॉलरट्यूनच्या माध्यमातून वनविभागाने वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे. अवैध वृक्षतोड व जंगलात लावणारे वणवे रोखण्यासाठीही अशा प्रकारच्या घटनांनी माहिती तातडीने वनविभागास द्यावी, असे आवाहनही या ट्यूनच्या माध्यमातून केले आहे.गावोगावी सूचनाफलकउन्हाळा सुरू झाला असून, जिल्ह्यात वणवे लावण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. या वणव्यात वृक्षसंपदेची हानी होत असून शेकडो पशू-पक्षी जीव गमावत आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी वनविभागाने गावोवागी सूचनाफलक लावले आहेत.