शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

आवड नव्हे तर कर्तव्य समजून झाडे लावली

By admin | Updated: June 16, 2017 01:01 IST

जयप्रकाश कोळेकर : पर्यावरण हे कुटुंब--आम्ही जगवली झाडे..!

शेखर धोंगडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केवळ एक-दोन नव्हे, तर शेकड्यांनी झाडे लावली. ती आज २० ते ३२ वयाची झाली आहेत. कारण जितके मुलांचे वय तितक्याच वयाची जगलेली अनेक ठिकाणची झाडे आजच्या क्षणालाही छान सावली व फळ देताहेत. मुलांच्या संगोपनाप्रमाणेच १९८७ पासून झाडे लावली व ती जगविली, असे कोरोची माळ (ता. इचलकरंजी) येथील वयाची सत्तरी पार केलेले निवृत्त आरोग्य अधिकारी जयप्रकाश कोळेकर हे अभिमानाने सांगतात.दरवर्षी ७ जूनला मुलगीचा वाढदिवस व पर्यावरण दिनी गेली ३२ वर्षे न चुकता सातत्याने झाडं लावण्याचे कर्तव्य आजही बजावत आहेत. वृक्षसंवर्धन, योगा व आरोग्यालाही तितकेच महत्त्व द्या असा त्यांचा संदेश आहे. निसर्ग जपा, सुंदर जगा हा सर्वांना कानमंत्र देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करीत असतात. पर्यावरण व आरोग्य हे एकमेकांवर अवलंबून असल्याने ते सर्वांनी जपले पाहिजे.आवड नव्हे, कर्तव्य समजून झाडे लावली. निसर्गाने इतके दिले, त्याचे थोडेसे तरी आपण देणं लागतो. या भावनेतूनच अखंडितपणे मुलांचे वाढदिवसानिमित्त व मिळेल त्या मोकळ््या जागेत रोप लावली. ती जगविलीही. काहींना वृक्षसंवर्धनविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोकळी जागा, अंगण दिले. तेथे झाडे लावली. आज त्यांनाही त्या झाडांचे महत्त्व समजले आहे. तेही ही झाडे जगवू लागली आहेत. - जयप्रकाश कोळेकर  कोरोची, इचलकरंजी.लावलेली झाडेनारळ, पिंपल, जांभूळ, शिसम, रामफल, लिंबू, लिंबू, तांबडा चाफा, पारिजात, आस्ट्रे, बाभूळ प्रत्येकी एक, आवळा, काजू, फणस, पपई, फणस, उंबर, प्रत्येकी दोन, आंबे, पेरू प्रत्येकी तीन, सीताफळ, कडूलिंब प्रत्येकी चार, पिकनेर, पांढरा चाफा, सागवान प्रत्येकी पाच, शेवगा १०, अशोक १२, जास्वंद, बोगमवेल प्रत्येकी पाच, गुलाब चार प्रकार, कोरांटी २, कोरफड, निवडुंग, अडुलसा, निरगुंडी, तुळस, सदाफुली, रातराणी, गुलवेल, वेकंड, कडीपत्ता, आबोली, गोखर्ण, पानफुटी,नाग दोन, मधुपर्णी, हळद, पर्णकमल, रानकांदा, लहान मोठी लिली, ओवा, शोभेची काही झाडे, सुरण, मोगरा, कुंदा इत्यादी ५५ ते ६० प्रकारच्या झाडाबरोबरच शेकडो झाडे जगविली. ठिकाणेही झाडे कोरोची माळ येथील स्वत:च्या जागेसह शेजारच्यांची मोकळी जागा, मित्रांचे अंगण व विविध गावचे पाहुणे यांच्याही अंगणातही झाडे लावली व ती जगविली. सर्व झाडे सर्वसाधारण तीसच्या वयाची असून या महिन्यातही २० पेक्षा अधिक झाडे लावली आहेत.कर्तव्य जपा--निसर्ग आपल्याला जगवितो तसेच आपणही कर्तव्य म्हणून पर्यावरणाचे हित जपावे. प्रकृतीसाठी योगा, आहार व पर्यावरणासाठी प्रदूषण टाळणे महत्त्वाचे असल्याने ते आजही कचऱ्याचे खत व सांडपाण्याचा उपयोग बगीच्यासाठी व आरोग्यासाठी सायकलिंगला महत्त्व देतात.