शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या जन्मानंतर वृक्षारोपण सोहळा, पाच हजार दाम्पत्यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 14:18 IST

जुलै महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक कुटुंबाने १० झाडे लावण्यासाठी परवानगी मागितली.

- सागर गुजर 

सातारा : मुलीच्या जन्माचा सोहळा वृक्षलागवड करून साजरा करण्यात जिल्ह्यातील हजारो शेतकरी गुंतले आहेत. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून ‘कन्या वन समृद्धी’ योजनेत तब्बल ५ हजार ६४८ शेतक-यांनी सहभाग घेतला असून, ५६ हजार ४८० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. सातारा तालुक्यातील ६२७, क-हाडमधील २८९, पाटणमधील १६५, जावळीतील ३९०, कोरेगावातील ६४०, वाईमधील ७९६, येथील १ हजार २१४, खटावमधील ३०१, माण मधील ४६२, फलटण मधील ७६४ अशा एकूण ५ हजार ६४८ शेतकरी कुटुंबांनी या योजनेत सहभागी घेतला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक कुटुंबाने १० झाडे लावण्यासाठी परवानगी मागितली. मुलीच्या जन्मानंतर पहिल्या पावसात खड्डे काढण्यात आले. सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थीनिहाय १० रोपे ग्रामपंचायतींना विनामूल्य देण्यात आली. या झाडापासून मिळणा-या सर्व उत्पन्नातून मुलीला कौशल्य विकास व उच्च शिक्षण तसेच रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा पैसा वापरायचा आहे. ज्या शेतक-यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त २ मुली जन्माला येतील व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाईल, त्यांच्याचपुरती ही योजना मर्यादित आहे. 

सामाजिक वनीकरणतर्फे मार्गदर्शनशेतकरी घरात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीत नोंद केली जाते. त्याच ठिकाणी वनविभागाचा अर्ज भरून शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. दरम्यान, लागवड केलेल्या झाडांची निगा, संरक्षण, संगोपन तसेच झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण जास्त राहावे, यासाठी शेतक-यांना तांत्रिक सल्ला सामाजिक वनीकरण विभागामार्फत देण्यात येत आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांनी दरवर्षी ३१ मे रोजी वृक्ष जिवंत असल्याच्या प्रमाणाबाबत ग्रामपंचायतीला माहिती द्यायची आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर