शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

..अन् कारमधून निघाला अजगर, कऱ्हाडात थरार; सर्पमित्रांनी केले ‘रेस्क्यू’

By संजय पाटील | Updated: August 10, 2023 14:27 IST

कोकणातून मध्यरात्री कऱ्हाडात पोहोचले. हॉटेलमध्ये जेवून पुन्हा कारमध्ये बसायला गेले, अन्..

कऱ्हाड : कोकणातून कारमधून पुण्याला निघालेले कुटूंब मध्यरात्री कऱ्हाडात पोहोचले. येथील एका हॉटेलात जेवण केल्यानंतर ते पुन्हा कारमध्ये बसायला गेले; पण कारजवळ जाताच त्यांना धक्का बसला. कारमध्ये चक्क एका अजगराने ठाण मांडलेले. अखेर सर्पमित्रांनी धाव घेत अजगराला सुरक्षित पकडले. त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.चिपळूणमधील एक कुटूंब कारमधून पुण्याच्या दिशेने निघाले होते. पाटणमार्गे कऱ्हाडातील वारुंजी फाट्यावर आल्यानंतर संबंधित कुटूंबिय तेथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले. जेवण आटोपल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा सर्वजण कारमध्ये बसायला गेले. त्यावेळी चालकाने ‘कुलंट’ तपासण्यासाठी कारचे बोनेट उघडले; पण बोनेट उघडताच सर्वांना धक्का बसला. बोनेटमध्ये चक्क एक अजगर ठाण मांडून बसलेला. या प्रकारामुळे हादरलेल्या संबंधित कुटूंबियांनी हॉटेलच्या सुरक्षारक्षकाला याबाबतची माहिती दिली.सुरक्षारक्षकाने हॉटेलमधील विशाल विधाते या कर्मचाºयाला त्याठिकाणी बोलवले. विशालने तातडीने याबाबतची माहिती सर्पमित्र उदित कांबळे यांना दिली. सर्पमित्र कांबळेही मध्यरात्री त्याठिकाणी धावून गेले. त्यांनी कारमधून सुरक्षितरीत्या त्या अजगराला बाहेर काढून एका पोत्यात ठेवले. तसेच याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी अजगराला ताब्यात घेऊन मध्यरात्रीच जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.या घटनेनंतर संबंधित कुटूंब पुन्हा कारमध्ये बसण्यासही घाबरत होते. मात्र, सर्पमित्र उदीत कांबळे यांच्यासह इतरांनी सर्व कार तपासून त्यामध्ये दुसºया कोणत्याच जागी सर्प नसल्याची खात्री करुन घेत संबंधित कुटूंबियांना निर्धास्त केले. त्यानंतर ते कुटूंबिय पुढील प्रवासाला मार्गस्थ झाले.

कऱ्हाडात पहिल्यांदाच आढळला अजगरकऱ्हाडात अनेक सर्पमित्र कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध जातीचे सर्प शहरासह परिसरातून पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. मात्र, आजपर्यंत कऱ्हाडात अजगर जातीचा सर्प आढळून आला नव्हता. अजगर आढळल्याची कऱ्हाडातील ही पहिलीच घटना असल्याचे सर्पमित्र उदीत कांबळे, योगेश शिंगण यांनी सांगीतले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड