शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

पाटणला महामार्गावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

कऱ्हाड-चिपळूण हा मार्ग पश्चिम महाराष्ट्रामधून कोकणला जाणारा जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून पुणे, सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर आणि सांगली या ...

कऱ्हाड-चिपळूण हा मार्ग पश्चिम महाराष्ट्रामधून कोकणला जाणारा जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून पुणे, सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणांहून अवजड वाहनांची कायम ये-जा सुरू असते. या मार्गाचे महत्त्व लक्षात घेता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. आणि रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली. रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे आणि तातडीने चौपदरीकरण सुरू झाल्यामुळे तालुक्याचा विकास होणार, या आशेने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच या मार्गावर पाटण येथे एसटी बसस्थानकानजीक मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत अनेक वाहने आदळून अपघात होत आहेत. तसेच वाहनांचेही नुकसान होत आहे. या मार्गावरून सामान्य जनतेसह मंत्री, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींची वर्दळ असते. मात्र, जीवघेणे ठरणारे हे खड्डे बुजविण्याबाबत संबंधित विभागाला अद्यापही कुणी सूचना दिलेली नाही, हे दुर्दैव.

- चौकट

विकासाऐवजी निर्माण झाल्या समस्या

कऱ्हाड-चिपळूण रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू होऊन दोन वर्षे उलटली. मात्र, अद्यापही काम पूर्णत्वास गेले नाही. रस्त्याचे काम रेंगाळल्यामुळे जनतेत नाराजी आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे तालुक्याचा विकास होईल, अशी अपेक्षा असताना विकासाऐवजी समस्याच निर्माण झाल्या.

फोटो : ०७केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाड ते चिपळूण मार्गावर पाटण येथील बसस्थानकानजीक मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहने याठिकाणी आदळून अपघात होत आहेत. (छाया : प्रवीण जाधव)