शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिलाणीवाडीत सव्वा लाखाची घरफोडी; पार्टनरशीपच्या आमिषाने युवकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:28 IST

सातारा : पिलाणीवाडी (वरची) ता. सातारा येथील चंद्रभागा बाळकृष्ण साळुंखे (वय ४०) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी दुपारी साडेअकराच्या ...

ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत गुप्ता याला अटक झाली नव्हती.

सातारा : पिलाणीवाडी (वरची) ता. सातारा येथील चंद्रभागा बाळकृष्ण साळुंखे (वय ४०) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास सव्वा लाखाचे दागिने चोरून नेले. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रभागा साळुंखे हा कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. पेटीतील पितळेच्या डब्यातील १ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. साळुंखे या काही वेळानंतर घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शना आले. यानंतर त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

 

व्यवसायात पार्टनरशीपच्या आमिषाने युवकाची फसवणूकसाडेसहा लाखांना गंडा : राजस्थानातील व्यावसायिकावर गुन्हासातारा : व्यवसायात पार्टनरशीप देण्याच्या आमिषाने साताºयातील एका युवकाला तब्बल साडेसहा लाखांना गंडा घातल्याचे समोर आले असून, याप्रकरणी राजस्थानमधील एका व्यावसायिकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुं सीताराम गुप्ता (सध्या रा. शिवाजी नगर, सातारा. मूळ रा. जयपूर, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, प्रवीण प्रकाश निकम (वय ३१, रा. माळवाडी, शाहूपुरी सातारा) यांची गुंड्डू गुप्ताशी अनेक वर्षांपासून ओळख होती. गुप्ता याचा मोती चौकातील एका गाळ्यात कपड्यांचा सेल होता. या व्यवसायामध्ये पार्टनरशीप देण्याचे आमिष गुड्डूने प्रवीण निकम यांना दाखविले. गुप्ता ओळखीचा असल्यामुळे त्यांनी साडेसहा लाख रुपये त्याच्या व्यवसायामध्ये गुंतवले. यावेळी त्यांनी त्याच्याकडून नोटरी करून घेतली होती. तसेच या बदल्यात गुप्ताने त्यांना धनादेशही दिला. मात्र, त्यावर त्याने बोगस सही केली. काही दिवसांनंतर गुप्ताने संबंधित सेल बंद केला. मात्र, निकम यांना त्यांचे पैसे आणि नफाही मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत गुप्ता याला अटक झाली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर