शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलीस निरीक्षक निघाला दहावी नापास-लाल दिव्याच्या गाडीसोबत फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:45 IST

सातारा : जेमतेम दहावी पास झालेल्या शेतकऱ्याने आपण अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी चक्क लाल दिव्याच्या गाडीसोबत फोटो काढले. या फोटोच्या माध्यमातूनच त्याने युवकाला पोलीस दलात नोकरी लावतो, म्हणून अडीच लाखाला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. एका सर्वसामान्य शेतकºयाने केलेल्या अशाप्रकारच्या बनवेगिरीमुळे पोलीसही अवाक झाले आहेत.कोल्हापूर येथे एका कंपनीत हेल्पर म्हणून काम ...

ठळक मुद्देपोलीस दलात नोकरीच्या आमिषाने युवकाला अडीच लाखाला गंडा

सातारा : जेमतेम दहावी पास झालेल्या शेतकऱ्याने आपण अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी चक्क लाल दिव्याच्या गाडीसोबत फोटो काढले. या फोटोच्या माध्यमातूनच त्याने युवकाला पोलीस दलात नोकरी लावतो, म्हणून अडीच लाखाला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. एका सर्वसामान्य शेतकºयाने केलेल्या अशाप्रकारच्या बनवेगिरीमुळे पोलीसही अवाक झाले आहेत.

कोल्हापूर येथे एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाºया जितेंद्र सर्जेराव पाटील (वय २५, रा. ताटोली, ता. शिराळा, जि. सांगली) याची एका नातेवाइकाने साताºयातील करंजे पेठ येथे राहणाºया संदीप सोपान गायकवाड (वय ४१) याच्याशी ओळख करून दिली.त्यावेळी गायकवाड याने आपण पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर पाकिटात असलेला फोटो त्याला दाखविण्यात आला. त्या फोटोमध्ये लाल दिव्याच्या गाडीसमोर संदीप गायकवाड अगदी ऐटीत उभा राहिला होता.

हा फोटो पाहून जितेंद्र पाटील याला गायकवाड अधिकारी असल्याची खात्री पटली. त्यानंतरच दोघांमध्ये पोलीस दलात भरती करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली. गायकवाड याने अडीच लाखांची मागणी केली. याला जितेंद्र पाटील यानेही होकार दिला; परंतु मोठी रक्कम असल्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले.पाटील याने गायकवाडच्या खात्यावर टप्प्याटप्याने अडीच लाख भरले. आता आपण पोलीस दलात भरती होणार, असं स्वप्न जितेंद्र पाहू लागला. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांतील पोलीस भरती दोन वेळा पूर्ण झाल्या तरी मला बोलविले कसे जात नाही, अशी शंका जितेंद्रला येऊ लागली.

गायकवाडकडे याची विचारणा करू लागल्यानंतर गायकवाड उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या साºया प्रकाराला दोन वर्षे उलटली. तरी नोकरीचा काही थांगपत्ता लागण्याची चिन्हे नाहीत, हे जेव्हा अखेर जितेंद्रच्या लक्षात आले. तेव्हा त्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संदीप गायकवाडच्या विरोधात फसवणूक केल्याची तक्रार नोंदविली. जितेंद्र आणि संदीप गायकवाडची ज्या मुलाने ओळख करून दिली. त्या मुलाचीही आता पोलीस चौेकशी करणार आहेत. कोणत्या आधारे गायकवाड मुलांना पोलीस दलात भरती करतो, हे त्या संबंधित मुलाला माहित असावे, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कोणाच्या तक्रारी असतील तर तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन शाहूपुरी पोलिसांनी केले आहे.पोलीस घेणार त्या गाडीचा शोध..हवालदार अतीश कुमठेकर यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संदीप गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या. कुमठेकर यांनी त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर अनेक किस्से समोर आले. गायकवाड हा मूळचा वाई तालुक्यातील कळंबे गावचा. या ठिकाणी तो शेती करतो. मात्र, साताºयात तो नातेवाइकांकडे राहत आहे. येऊन-जाऊन तो गावी शेती व्यवसाय करतो. केवळ दहावी उत्तीर्ण असलेल्या गायकवाडने पोलीस अधिकारी असल्याचे दाखविण्यासाठी लाल दिव्याची गाडी निवडली. गाडीसमोर उभे राहून साध्या वेशात फोटोही काढले. मात्र, जी गाडी गायकवाडने फोटो काढण्यासाठी निवडली आहे. त्या गाडीचा नंबर फोटोमध्ये पोलिसांना स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पोलीस संभ्रमात पडले आहेत. त्याने काढलेल्या फोटोतील गाडीचा शोध घेतला जाणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर