शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Satara- फलटणला मानाच्या कावडींचे स्वागत, श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 11:34 IST

शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते

फलटण : शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाला परंपरागत पध्दतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी येतात. आज फलटणमध्ये सकाळी कावडी येताच भाविकांतर्फे या कावडींचे यथोचित स्वागत करण्यात आले. कावडीच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले होते. शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वतीमातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाचं लग्न लावलं जातं. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. या यात्रेनिमित्त फलटण येथून शिखर शिंगणापूरकडे जाणार्‍या या सर्व मानाच्या कावडी आपापल्या नियोजनाप्रमाणे परंपरागत मार्गाने शंभू महादेवाच्या पायथ्याशी मुंगीघाटाकडे मार्गस्थ झाल्या. तत्पूर्वी फलटणमधील भाविकांनी  या कावडींचे व त्यासोबत असणार्‍या मानकर्‍यांचे स्वागत करुन दर्शन घेतले. कावडी सोबत असणारी परंपरागत डफडी, शिंग, तुतार्‍या आणि हरहर महादेवाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता.सासवड (जि. पुणे) येथील भुतोजीबुवा तेली या कावडीचे व त्यासोबत असणार्‍या मानकर्‍यांचे व कावडीचे स्वागत व पूजन झाले.गुणवरे (ता. फलटण) येथील आढाव कुटुंबाच्या कावडीला वाटाड्याचा मान असून सर्वात पुढे असलेल्या या कावडीमागून उर्वरित कावडी मानानुक्रमे जातात तर तेल्या भुत्याच्या कावडीचा मान शेवटी असतो.मुंगी घाटातून या सर्व कावडी उद्या रविवार सायंकाळपर्यंत शिखर शिंगणापूर डोंगर पठारावर पोहोचतील आणि तेथून मानानुक्रमे शंभू महादेवाला जलाभिषेक करुन परततील दरम्यान मानकरी तसेच राज्यातील कावडीधारकांचा श्री. छ. राजमाता कल्पनाराजे भोसले, श्री.छ. खा. उदयनराजे भोसले, ग्रामपंचायत शिखर शिंगणापूर बडवे समाज आणि ग्रामस्थांच्यावतीने या सर्व कावडींचे व भाविकांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात येणार आहेत. प्रचंड उन्हाचा तडाखा आणि मुंगी घाटाची उभी चढन या कावडी व त्यांचे मानकरी आणि भक्त सहजपणे चढून जाताना पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक मोठया संख्येने घाटाच्या पायथ्याशी आणि पठारावर उपस्थित असतात. शंभू महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. विशिष्ठ प्रकारची वाद्ये आणि हर हर महादेवाचा जयघोषच मुंगी घाटातून कावडी वर नेण्याची प्रेरणा व शक्ती असल्याने त्याच्या निनादात आणि शंभू महादेवाच्या जयघोषात कावडी वर नेण्यात येतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी व मानाची कावड असते ती तेल्या भुत्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात.  मोठ्या कष्टाने कावड वर नेली जाते आणि रात्री 12 वाजता सप्त नद्या आणि शिंगणापूर परिसरातील पुष्कर तलावातील पाण्यानं शंभू महादेवाला जलाभिषेक घातला जातो. फलटणमध्ये कावडींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर