शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फलटण : ‘न्यू फलटण शुगर’च्या चेअरमनसह तिघांवर गुन्हा : कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:57 IST

फेब्रुवारी २०१८ ते आजअखेर न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकºयांचे अंदाजे ५१ कोटी रुपये न दिल्याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या

ठळक मुद्दे शेतकऱ्यांची ५१ कोटींच्या फसवणुकीचा ठपका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या उसाचे पैसे मिळण्याबाबत आंदोलन केले

फलटण : फेब्रुवारी २०१८ ते आजअखेर न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकºयांचे अंदाजे ५१ कोटी रुपये न दिल्याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत नारायण साहेबराव अभंग (वय ६५, रा विडणी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१८ पासून फलटण तालुक्यातील शेतकºयांनी साखरवाडी, ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्सला ऊस दिलेला होता. त्यानंतर १४ दिवसांनी कारखान्याने खात्यावर पैसे जमा करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी खात्यावर पैसे जमा केले नाहीत.

वेळोवेळी कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे-पाटील, व्हाईस चेअरमन धनंजय साळुंखे-पाटील व संचालक शामराव मारुती भोसले यांना खात्यावर पैसे जमा करण्यासाठी विनंती केली होती. तरीही त्यांनी खात्यावर पैसे जमा केले नाहीत. शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या उसाचे पैसे मिळण्याबाबत आंदोलन केले. यावेळी चेअरमन आणि संचालक मंडळाने ५ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करू, असे लेखी पत्र दिले होते. तरीही पैसे जमा झाले नाहीत.

यानंतर १४ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांचे उसाचे पैसे खात्यावर जमा करतो, असे प्रातांधिकारी यांच्यासमोर चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांनी लेखी दिले. परंतु ऊस कारखान्याला देऊन सात महिने झाले तरीही चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांनी समक्ष व फोनवरून वेळोवेळी बैठक घेऊन तुमचे पैसे आज जमा करतो, उद्या जमा करतो, असे म्हणूनही आश्वासन देऊनही एक पैसाही खात्यावर जमा केला नाही.

२८ टन उसाचे ७४ हजारांचे तर इतर ऊस उत्पादक शेतकºयांची अंदाजे ५१ कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे-पाटील, व्हाईस चेअरमन धनंजय साळुंखे-पाटील, संचालक शामराव मारुती भोसले यांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हंकारे हे करीत आहेत.प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन..एकीकडे शेतकºयांचे ऊस गाळपाचे पैसे न दिल्याबाबत गुन्हे दाखल झाले असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकºयांच्या थकीत ऊस बिलासाठी व कर्मचाºयांच्या थकीत पगाराबाबत प्रांत कार्यालयाच्या बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, सचिन खानविलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, प्रल्हादराव भोईटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSugar factoryसाखर कारखाने