शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Satara: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यानंतर फलटण तळ तीन तासांतच चकाचक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:35 IST

शहरही पुन्हा जैसे थे 

विकास शिंदे फलटण : स्वच्छता जिथे ईश्वराचा वास तिथे| या राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ओव्यांप्रमाणे कार्य करत फलटण पालिकेने नागरिकांची व वारकऱ्यांची मने जिंकली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा एका दिवसाच्या मुक्कामी पालखी सोहळ्यात शहरात जमा झालेला प्रचंड कचरा अवघ्या तीन तासांमध्ये दूर करुन चकाचक केला.फलटण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी पालखीचे प्रस्थान बरडकडे झाल्यानंतर लगेचच माउलींच्या पालखी प्रस्थानानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबविली. माउलींचा सोहळा तळाहून पुढे गिरवी नाका महात्मा फुले चौक नगरपरिषद, छत्रपती शिवाजी महाराज चौक नाना पाटील चौक मार्गे बरडकडे मार्गस्थ झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत पालखीतळ स्वच्छ करून नागरिकांना फिरण्यासाठी सायंकाळपर्यंत तो खुला करण्यात आला.पालखीच्या एका दिवसाच्या मुक्कामादरम्यान लाखो वारकरी, भाविक आणि विविध दुकानांमुळे शहरात कचऱ्याचा ढीग साचले होते. या पार्श्‍वभूमीवर, नगरपालिकेचे  कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी , विविध सामाजिक संस्था यांनी सहभाग घेत पालखी तळ स्वच्छ केला पाच ट्रॅक्टर, सोळा स्वयंचलित घंटागाड्या, अग्निशामक दल, दोन सेजिंग मशिन आणि जेसीबीच्या साहाय्याने सुमारे पाच टनांहून अधिक कचरा पालखी तळावरून उचलण्यात आला.  शहरातील सर्व भागांतून आणखी दहा ते ते पंधरा टन कचरा उचलण्यात येणार आहे. 

शहरात सर्वत्र पावडर फवारणी पालिकेकडून शहरात सर्वत्र पावडर फवारणी तसेच लिक्विड जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे, जेणेकरून आरोग्य राखले जाईल. फलटण पालिकेच्या १०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही साफसफाई मोहीम राबविण्यात आली, तसेच निर्मलवारीअंतर्गत शहरात हजारो फिरत्या स्वच्छतागृहांमुळे व्यवस्थेमुळे स्वच्छतेवरील ताण कमी झाला.

कागल, कराड, मलकापूर, महाबळेश्वर नगरपरिषदेचा सहभाग ..स्वच्छतेसाठी फलटण नगर परिषदेचे ७० कर्मचारी खाजगी तत्वावरील २५ कर्मचारी सातारा जिल्ह्यातील कराड महाबळेश्वर मलकापूर या नगरपालिकांचे १०० कर्मचारी तसेच कागल नगरपरिषद जिल्हा कोल्हापूर येथील २५ कर्मचारी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना याचे १५० विद्यार्थी उपस्थित होते. कचरा संकलनासाठी पाच ट्रॅक्टर ट्रॉली दोन जेसीबी मशीन १६ घंटा गाड्या इतकी वाहने होते. पालखी तळावरील कचरा संकलन हे पाच टन झाले असून शहरातील कचरा संकलन तीन टन आतापर्यंत झाले आहे.नॉट मी बट यू ..राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद वाक्य नॉट मी बट यू या प्रमाणे निःस्वार्थ भावनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे राष्ट्रीय सेवा योजना यातील डॉ प्रताप फळफळे वंदना सोनवणे , प्राध्यापक योगिता घाटोळे डॉ सुरेखा जाधव, डॉ मनीषा बोडके, अशोक पिलाने , अनिल केंगार यांच्या सोबत 150 विद्यार्थी यांच्यामार्फत फलटण पालखी तळ तीन तासात स्वच्छ करण्यात आला 

सोहळ्यादरम्यान कचरा उचलण्याचे काम सुरूच होते. पालिकेने प्रत्येक दिंडीला कचरा आणि शिल्लक अन्न साठवण्यासाठी मोठ्या पिशव्या देऊन उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन केले होते, ज्यामुळे स्वच्छतेच्या कामाला मदत झाली. यासाठी स्वतंत्र पथकही नेमण्यात आले होते. - निखिल मोरे , मुख्याधिकारी