शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

फलटणमधील ‘तो’ खून अवघ्या १५०० रुपयांसाठी

By admin | Updated: November 13, 2015 23:38 IST

एकास अटक : ‘अ‍ॅट्रॉसिटी’ही दाखल; तपासाबाबत गोपनीयता

फलटण : येथील मंगळवार पेठेतील अल्पवयीन मुलाचा खून अवघ्या १५०० रुपयांसाठी झाल्याची माहिती पुढे येत आहे. यासंदर्भात पोलिसांनी एकास अटक केली असली, तरी तपासाबाबत गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, या घटनेत ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.मंगळवार पेठेतील अनुराग सचिन अहिवळे या चौदा वर्षांच्या मुलाचा खून झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली होती. शिंदेवाडी (ता. फलटण) येथून फलटणकडे येत असताना श्रीराम सहकारी साखर कारखान्याजवळ असणाऱ्या झाडीत नेऊन अनुरागचा खून केल्याचे समोर आले होते. ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घडली होती. अनुरागवर धारदार शस्त्राने वार केल्याचे उघड झाले असून, डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अनुराग हा शिंदेवाडी येथील सविता रामचंद्र बनसोडे यांच्या घरातून फलटणकडे येत असताना ही घटना घडली होती. बनसोडे यांनीच घटनेची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुरागच्या खिशात दीड हजार रुपये होते आणि ते हिसकावण्यासाठीच त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला गेल्याचे तपासात समोर येत आहे.तसेच याप्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानेही गूढ वाढले आहे. अटक केलेल्या संशयिताविषयीही पोलिसांनी गोपनीयता राखली आहे. याबाबत फलटण शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपासबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. (प्रतिनिधी)